Join us
Daily Top 2Weekly Top 5

जेलमध्ये आत्महत्या करणार होता अभिनेता, वडील वारले, आईला कर्करोग, म्हणाला- मरणयातना भोगायचो....

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2023 16:22 IST

अभिनेता की तो रोज मरणयातना भोगायचा. अभिनेत्याने असेही सांगितले की त्याच्याकडे पेन आहे आणि त्याने तो आपले आयुष्य संपवण्याचा विचार करायचा.

अभिनेता पर्ल वी पुरीचा पहिला बॉलिवूड सिनेमा  'यारियाँ २' चं यशाचा सध्या आनंद घेतेय. या चित्रपटातील त्याची भूमिका चाहत्यांना आवडली आहे. पर्ल आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात टेलिव्हिजनमधून केली होती आणि तो 'नागिन 3' या शोमध्येही दिसला होता.  2021मध्ये एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याचा आरोपखाली त्याला अटक करण्यात आली होती. त्यामुळे अभिनेत्याला तुरुंवासदेखील भोगावा लागला होता. यानंतर त्याला या आरोप या आरोपतून मुक्तही केले गेले. 

अलीकडेच, सिद्धार्थ काननसोबत त्याच्या शोसाठी संभाषणात, पर्ल पुरीने त्याच्या आयुष्यातील सर्वात कठीण टप्प्याबद्दल सांगितले. पर्लने सांगितलं त्याने आयुष्यात खूप संघर्ष केला आहे आणि तरीही कोणीतरी त्याच्यावर खोटा गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न केला. तुरुंगातील आयुष्याबद्दल बोलताना पर्ल म्हणाला की तो रोज मरणयातना भोगायचा. अभिनेत्याने असेही सांगितले की त्याच्याकडे पेन आहे आणि त्याने तो आपले आयुष्य संपवण्याचा विचार करायचा. 

पर्ल पुरी म्हणाला, 'मी रोज तुरुंगात मरतो, मी सांगूही शकत नाही. 11व्या दिवशी माझ्याकडे एक पेन होता आणि पेनाचा वापर करुन आत्महत्या करता येते, हे मी चित्रपटात पाहिलं होतं.. मला माहीत होतं की असं होतं. 11 व्या दिवशी मला वाटले की पप्पा निघून गेल्यामुळे हे होणार आहे. आई इतकी आजारी होती की तिची  अवस्था काय आहे हे मलाही माहीत नव्हते. मी काय करतोय हेही कळत नव्हतं.

पुढे पर्ल म्हणाला की, तो रोज हनुमान चालिसाचे १०८ वेळा पठण करायचा आणि संकल्प पूर्ण होण्यापूर्वीच त्याने जीव देण्याचा विचार केला. मला लिहायला आवडते असे सांगून त्याने एका पोलिसाकडून पेन घेतला, मात्र त्याचा हेतू स्वत:चा जीव घेण्याचा होता, असे अभिनेता म्हणाला. काही वर्षांपूर्वी पर्लने सांगितले होते की, त्या काळात त्याने आपली आजी गमावली होती आणि काही महिन्यांनंतर त्याचे वडील वारले. नंतर त्याच्या आईला कर्करोग झाला आणि त्यानंतर त्याच्यासोबत हा धक्कादायक प्रकार घडला.

टॅग्स :सेलिब्रिटी