Join us

Wow...! थायलंडच्या रस्त्यावर शाहिद व मीराची मुलांसोबत सायकल स्वारी, पहा त्यांचे खास फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2019 13:11 IST

'कबीर सिंग' चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी शाहिद कपूर आपल्या कुटुंबासमवेत थायलंडमध्ये सुट्टी एन्जॉय करतो आहे.

अभिनेता शाहिद कपूर सध्या पत्नी मीरा राजपूत आणि मुले मीशा व झेन यांच्यासोबत थायलंडमध्ये सुट्टी एन्जॉय करतो आहे. सोशल मीडियावर त्यांचे छान फोटो पहायला मिळत आहे. सर्व फोटो खूप मस्त असून त्यातील काही फोटोंमध्ये ते सायकल चालवताना दिसत आहेत. हे फोटो स्वतः मीरा व शाहिदने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंवर लाईक्स व कमेंट्सचा वर्षाव होत आहे. 

शाहिद कपूर व त्याची पत्नी मीरा यांनी आज सकाळी मीशा व झेनसोबत थायलंडच्या रस्त्यावर सायकल चालवण्यासाठी बाहेर पडले. या सायकलिंगच्या वेळचे फोटो मीराने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोत सायकलवर शाहिदसोबत झेन तर मीरासोबत मीशा पाठीमागे बसलेली दिसते आहे. हे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

शाहिद कपूरने मीरा राजपूतसोबत जुलै २०१५मध्ये विवाह बंधनात अडकला. त्या दोघांचे फोटो नेहमी सोशल मीडियावर पहायला मिळतात. त्यांच्या फोटोंना खूप चांगला प्रतिसाद मिळतो. 

शाहिद कपूरचा आगामी चित्रपट कबीर सिंगचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. हा चित्रपट दाक्षिणात्य सिनेमा अर्जुन रेड्डीचा हिंदी रिमेक आहे.

संदीप वंगा दिग्दर्शित या सिनेमात शाहिद कबीर सिंगची भूमिका साकारत आहे. प्रेमात असणारा शाहिद आणि प्रेमभंग झाल्यानंतरचा शाहिद या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये दिसतोय.  

ट्रेलरमध्ये कबीर सिंग एका मेडिकल स्टुडंटच्या रूपात दिसतो. हा कबीर सिंग त्याची ज्युनिअर  (किआरा अडवानी) हिच्या प्रेमात पडतो. स्वभावाने अतिशय रागीट, शीर्घकोपी असलेल्या या कबीरचा पुढे प्रेमभंग होतो आणि तो दारुच्या आहारी जातो, अशी थोडक्यात या सिनेमाची कथा आहे.  

हा चित्रपट २१ जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

टॅग्स :शाहिद कपूरमीरा राजपूत