Join us

‘बॉबी जासूस’ चा सिक्वेल बनवायला आवडेल’ - दिया मिर्झा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2016 19:00 IST

विद्या बालनचा ‘बॉबी जासूस’ हा चित्रपट आठवतोय ना? यात विद्याने एका गुप्तहेराची भूमिका साकारली आहे. रोमँटिक-कॉमेडी-थ्रिलरपट असलेल्या या चित्रपटाने ...

विद्या बालनचा ‘बॉबी जासूस’ हा चित्रपट आठवतोय ना? यात विद्याने एका गुप्तहेराची भूमिका साकारली आहे. रोमँटिक-कॉमेडी-थ्रिलरपट असलेल्या या चित्रपटाने बॉक्स आॅफिसवर बऱ्यापैकी कमाई केली. आता या चित्रपटाचा सिक्वेल बनवण्याची मागणी पुढे येतेय. साहिल संघा आणि दिया मिर्झा निर्मित हा चित्रपट असल्याने आता ती सिक्वेलबद्दल गंभीरपणे विचार करते आहे. निर्माती-अभिनेत्री दिया मिर्झा म्हणते,‘ बॉबी जासूस या चित्रपटाचा सिक्वेल बनवायला मला नक्कीच आवडेल. प्रेक्षकांना ज्या प्रकारचे चित्रपट पाहायला आवडतात तशा चित्रपटांची निर्मिती करायला मला आवडतं. अशा कथानकांचे चित्रपट बॉक्स आॅफिसवर चांगली कमाई करू शकतात. सिक्वेलपेक्षाही प्रिक्वेलला जास्त पसंती मिळते. आम्हाला प्रेक्षकांना विचार करायला भाग पाडणारे चित्रपट बनवायचे असतात. पण, त्याचबरोबर त्यांनी बॉक्स आॅफिसवर चांगली कमाई करणंही अपेक्षित असतं.’ विद्या बालन, अली फजल, अर्जन बजवा, सुप्रिया पाठक आणि तन्वी आझमी यांच्या मुख्य भूमिकेतील ‘बॉबी जासूस’ या चित्रपटाने बॉक्स आॅफिसवर फार काही विशेष कमाई केली नाही. ‘बिलकिस बॉबी अहमद’ या हैदराबादी महिलेची ही कथा असून, तिच्या आयुष्यात येणाऱ्या  अडचणींवर मात करून ती तिचा गुप्तहेराचे कर्तव्य पार पाडणे सुरूच ठेवते. पाहूयात, आता दियाने जर मनावर घेतलं तर नक्कीच लवकर ‘बॉबी जासूस’चा सिक्वेल पहावयास मिळेल.