Join us
Daily Top 2Weekly Top 5

संजय दत्त आणि सैफ अली खानसोबत केलंय काम, राजघराण्यात जन्मलेल्या या अभिनेत्रीला ओळखलंत का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2023 08:00 IST

या अभिनेत्रीची आई आणि आजी प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री आहेत आणि तिची पणजी बिहारच्या राजकुमारी होत्या.

बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्या राजघराण्यातून येतात. या बॉलिवूड अभिनेत्रीचे देखील असेच व्यक्तिमत्त्व आहे, जिची आई आणि आजी प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री आहेत आणि तिची पणजी बिहारच्या राजकुमारी होत्या. यावरुन तुम्ही अंदाज लावू शकता की आम्ही कोणत्या अभिनेत्रीबद्दल बोलत आहोत?, फोटोत दिसणाऱ्या या क्युट मुलगी कोण आहे हे ओळखण्याचा प्रयत्न करा?

 हा थ्रो बॅक फोटोत आपल्याला दोन मुली दिसतील. त्यापैकी एक बॉलिवूड अभिनेत्री आहे आणि तिने बंगाली इंडस्ट्रीत देखील तिनं खूप नाव कमावलं आहे. तुम्ही अजूनही या अभिनेत्रीला ओळखू शकला नसला तरी आम्ही सांगतो ती कोण आहे. फोटो डाव्या बाजूला दिसणारी मुलगी बॉलिवूड अभिनेत्री रायमा सेन आहे. 

रायमाचा जन्म 7 नोव्हेंबर 1979 रोजी एका राजघराण्यात झाला. तिची आजी इला देवी बडोद्याचे राजे सयाजीराव गायकवाड यांची तिसरी कन्या आणि तिची पणजी इंदिरा राजे या कूचबिहारच्या राजकन्या होत्या. इतकंच नाही तर रायमा सेनची आई प्रसिद्ध अभिनेत्री मून मून सेन आणि आजी सुचित्रा सेन आहेत, त्या त्या काळातील प्रसिद्ध अभिनेत्री होत्या.

 रायमा सेनने तिच्या फिल्मी करिअरची सुरुवात 1999 मध्ये आलेल्या 'गॉडफादर' या चित्रपटातून केली होती, मात्र हा चित्रपट मोठ्या पडद्यावर फारशी कमाल दाखवू शकला नाही. याशिवाय दमन, परिणीता, हनीमून ट्रॅव्हल्स प्रायव्हेट लिमिटेड, एकलव्य, फुंटुश आणि दस यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले. . मेहमन, लव्ह बर्ड्स आणि हॅलो यांसारख्या अनेक वेब सीरिजमध्ये तिने काम केलं आहे.

टॅग्स :सेलिब्रिटी