बाहुबली प्रभास आणि कंगना रणौत यांनी एकत्र केले होते काम
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2018 14:37 IST
बॉलिवूडची क्वीन कंगना रणौत आणि प्रभासने बाहुबलीच्या आधी एकत्र चित्रपटात काम केले होत. होय, तुम्ही बरोबर वाचलात दोघांनी एकत्र ...
बाहुबली प्रभास आणि कंगना रणौत यांनी एकत्र केले होते काम
बॉलिवूडची क्वीन कंगना रणौत आणि प्रभासने बाहुबलीच्या आधी एकत्र चित्रपटात काम केले होत. होय, तुम्ही बरोबर वाचलात दोघांनी एकत्र स्क्रीन शेअऱ करत रोमांस ही केला होता. कंगना आणि प्रभासने एक निरंजन या चित्रपटात एकत्र काम केले आहे. एक निरंजनमध्ये कंगनाने समीरा नावाची मुलीची भूमिका साकारली होती. 2008मध्ये फॅशन चित्रपटानंतर हा चित्रपट प्रदर्शित झाला. खूप कमी लोकांना हे माहिती आहे कंगनाने तेलुगूमध्ये नाही तर तामिळ चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यावेळी कंगनाला नुकतेच बॉलिवूडमध्ये यश मिळत होते. आता कंगना आणि प्रभास आपल्या करिअरच्या यशाच्या शिखरावर आहेत. बाहुबलीनंतर प्रभासची किर्ती आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचली आहे. प्रभासबद्दल बोलताना कंगना म्हणाली प्रभासने मिळावलेले हे यश बघून मला खूपच आनंद झाला. जेव्हा आम्ही एकत्र काम केले होते तेव्हा आमच्यात खूप भांडण व्हायची होती. आम्ही एकमेकांशी प्रचंड भांडायचो. या भांडणानंतर आम्ही एकमेकांशी बोलण बंद केले होते. मी नुकताच बाहुबली चित्रपट बघितला आणि तोंडून वाऊव हा शब्द बाहेर आला. त्यांनी मिळवलेले यश खरचं कौतुकास्पद आहे. प्रभासने साहोशिवाय दुसऱ्या कोणताच चित्रपटाची अजून घोषणा नाही केली. बाहुबली बरोबर साहोचा टीजर रिलीज करण्यात आला आहे. सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट ही आहे की अजून चित्रपटाची शूटिंग सुरु ही झाली नाही आहे. पुन्हा एकदा कंगना आणि प्रभासच्या जोडीला मोठ्या स्क्रिनवर पुन्हा एकदा बघायला एक मजेशीर अनुभव असेल. त्यामुळे कंगना आणि प्रभासला मोठ्या पडद्यावर पाहायला नक्कीच त्यांचे चाहत्ये उत्सुक असतील.