Join us
Daily Top 2Weekly Top 5

नृत्याधारित चित्रपटात काम करायचंय -आदिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2016 13:36 IST

अभिनेत्री आदिती राव हैदरी हिने अमिताभ बच्चन यांच्यासोबत चित्रपट 'वझीर' मध्ये उत्तम भूमिका केली असून ती नृत्यावर आधारित चित्रपटात ...

अभिनेत्री आदिती राव हैदरी हिने अमिताभ बच्चन यांच्यासोबत चित्रपट 'वझीर' मध्ये उत्तम भूमिका केली असून ती नृत्यावर आधारित चित्रपटात काम करण्यासाठी अक्षरश: बैचेन आहे. खरंतर आदिती राव हैदरी ही उत्तम डान्सर आहे. त्यामुळे ती म्हणते,' माझ्या डान्स स्किल्सचा वापर व्हायला हवा यासाठी मला एखाद्या नृत्याधारित चित्रपटात काम करायचे आहे. वझीर चित्रपट डान्सविषयी नसून तो एक थ्रिलर मिस्ट्री आहे. मला डान्स करायला आवडते म्हणून मला डान्सवर आधारित चित्रपटात काम करायचंय. आदिती हिने 'यह साली जिंदगी' मध्ये काम क रून उत्तम अभिनयासाठी तिचे नाव घेतले जाते. वझीर मध्ये फरहान अख्तर, निल नितीन मुकेश आणि जॉन अब्राहम हे आहेत.' भूमिकेविषयी चर्चा होत असेल तर ती स्वत:ला कुठलेही बंधने घालू शकत नाही.'