Join us

आलियाला हवाय आॅस्कर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2016 10:41 IST

आलिया भट्ट ही सध्या चांगलीच फॉर्मात आहे. ‘उडता पंजाब’ मध्ये तिने स्थलांतरित झालेल्या एका बिहारी युवतीची भूमिका केली आहे. ...

आलिया भट्ट ही सध्या चांगलीच फॉर्मात आहे. ‘उडता पंजाब’ मध्ये तिने स्थलांतरित झालेल्या एका बिहारी युवतीची भूमिका केली आहे. एका मुलाखतीदरम्यान बोलताना ती म्हणते,‘ मी अगदी खºया भावनांसह चित्रपटात काम केले आहे. ‘स्टुडंट आॅफ द ईअर’ मध्ये ज्याप्रमाणे मी काम केलेय.त्याचप्रमाणे मी उडता पंजाब मध्येही काम केले आहे. शाहीदही खºया आयुष्यात कधीही ड्रिंक्स करत नाही. पण त्याने यात अतिशय खरे वाटण्यासारखे काम केले आहे. ’तिला लग्नाबद्दल काय प्लॅन्स आहेत असे विचारण्यात आले असता ती म्हणते,‘ सामान्य मुलीसाठी लग्न म्हणजे काय असते तर सर्व लोक जमणे त्यांच्यासमोर आपले कौतुक होणे हेच ना? तर मग माझ्यासाठी त्याचा अर्थ वेगळा आहे. मला लोक जमलेले नक्कीच आवडतात पण ते मला आॅस्कर मिळताना पाहण्यासाठी.’