सोनमला करायचेत महिलाप्रधान चित्रपट
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2016 16:39 IST
सोनम कपूरने ‘नीरजा’ चित्रपट केला. आणि तिच्यावर कौतुकांचा वर्षाव झाला. ‘नीरजा भनोत’ या एअरहॉस्टेसच्या जीवनचरित्रावरील ही बायोपिक बी टाऊन ...
सोनमला करायचेत महिलाप्रधान चित्रपट
सोनम कपूरने ‘नीरजा’ चित्रपट केला. आणि तिच्यावर कौतुकांचा वर्षाव झाला. ‘नीरजा भनोत’ या एअरहॉस्टेसच्या जीवनचरित्रावरील ही बायोपिक बी टाऊन मध्ये कौतुकास्पद ठरली.आता ती म्हणतेय की, ‘मला महिलाप्रधान चित्रपटाचा भाग व्हायला नक्की आवडेल. मी केलेल्या कामाची समाजाने नोंद घ्यावी. मला त्यात कुठल्याही प्रकारचा कमर्शियल फायदा नको आहे. पण, कलाकार म्हणून कुणालाही ज्या स्क्रिप्टवर काम करायला आवडेल तो चित्रपट करायला मी केव्हाही तयार असेन. महिलाप्रधान चित्रपटांमध्ये महिलाच हिरो असतात, ते मला मनापासून आवडते.’