महिला सुपरहिरो चित्रपटात काम करायला आवडेल -अनुष्का
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2017 18:26 IST
बॉलिवूडची ‘पॉवर हाऊस’ अभिनेत्री अनुष्का शर्मा ही ‘ऐ दिल हैं मुश्किल’ ला मिळालेल्या यशानंतर अचानक गायबच झाली. बॉयफ्रेंड विराट ...
महिला सुपरहिरो चित्रपटात काम करायला आवडेल -अनुष्का
बॉलिवूडची ‘पॉवर हाऊस’ अभिनेत्री अनुष्का शर्मा ही ‘ऐ दिल हैं मुश्किल’ ला मिळालेल्या यशानंतर अचानक गायबच झाली. बॉयफ्रेंड विराट कोहली याच्यासोबत अलीकडेच ती दिसली होती. अशी चर्चा आहे की, ती सध्या तिचा होम प्रोडक्शन असलेल्या ‘फिलौरी’ चित्रपटाच्या चित्रिकरणात व्यस्त आहे. अनुष्का म्हणते,‘मी दररोज नव्या प्रोजेक्टच्या शोधात असते. मात्र, मला आता महिलांवर आधारित सुपरहिरो चित्रपटात काम करायला नक्की आवडेल.’ करण जोहर दिग्दर्शित ‘ऐ दिल हैं मुश्किल’ चित्रपटातील अनुष्का शर्मा आणि रणबीर कपूर यांच्या जोडीला चाहत्यांनी अक्षरश: डोक्यावर घेतले. मैत्री कशी असावी? तर रणबीर -अनुष्कासारखी असे सहजच सगळे बोलून जाताना दिसत आहेत. मात्र, चित्रपटाचे झालेले एवढे कौतुक पाहता अनुष्काने मात्र चित्रपटाचे यश बिल्कुल तिच्या डोक्यात जाऊ दिलेले नाहीये. ती पुन्हा तिच्या कामात व्यस्त झाली आहे. काहीतरी आव्हानात्मक भूमिका करू इच्छिणारी अनुष्का म्हणते,‘मला अॅक्शन चित्रपट किंवा त्यासंदर्भातील चित्रपटांमध्ये काम करायला नक्कीच आवडेल. त्याबद्दल अनेक कल्पनाही माझ्या डोक्यात येतात. मी आणि माझा भाऊ याविषयी चर्चा करतो. ‘क्रिश ४’ ची आॅफर मला आलेली नाही. माझं नाव उगीचच एखाद्या चित्रपटाशी जोडलं जातं जेव्हा माझा त्याच्यासोबत कुठलाही संबंध नाही. पण, नक्कीच मला ‘क्रिश’ च्या चौथ्या भागात काम करायलाा आवडेल.’बॉलिवूडच्या खंबीर आणि बिनधास्त अभिनेत्रींमध्ये अनुष्का शर्मा हिचं नाव घेतलं जातं. ती अशी अभिनेत्री आहे जिने तिचे करिअर सुरू असतानाही निर्मितीक्षेत्रात पाऊल ठेवले. ‘फिलौरी’या चित्रपटातून ती बॉलिवूडमध्ये निर्मितीक्षेत्रात डेब्यू केला आहे.