रणबीरवर साक्षी ‘फिदा’!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2016 16:36 IST
रणबीर कपूर सध्या ‘ऐ दिल हैं मुश्किल’ चित्रपटामुळे प्रचंड चर्चेत आहे. चित्रपटाच्या प्रमोशनची जबाबदारी आता रणबीरने स्वत:च्या खांद्यावर घेतली ...
रणबीरवर साक्षी ‘फिदा’!
रणबीर कपूर सध्या ‘ऐ दिल हैं मुश्किल’ चित्रपटामुळे प्रचंड चर्चेत आहे. चित्रपटाच्या प्रमोशनची जबाबदारी आता रणबीरने स्वत:च्या खांद्यावर घेतली आहे. नुकताच तो एका टीव्ही रिअॅलिटी शोमध्ये प्रमोशनसाठी आला होता. तिथे रणबीरने एन्ट्री केली आणि उपस्थित सर्व लेडिज त्याच्या चार्मने प्रभावित झाल्या.अशावेळी ‘आॅलिम्पिक्स २०१६’ रेसलिंग विनर साक्षी मलिक ही तरी कशी मागे राहील? यावेळी रणबीरला पाहून साक्षी मलिकही त्याच्यावर फिदा झाली. स्टेजवरच रणबीरने मग साक्षीला प्रपोज केले. तिच्यासोबत काही रोमँटिक मोमेंट्स पण शेअर केले.रणबीरच्या या आगामी चित्रपटात ऐश्वर्या रॉय बच्चन आणि अनुष्का शर्मा हे देखील दिसणार आहेत. चित्रपट २८ आॅक्टोबरला रिलीज होईल.