Join us

लग्न न करताही आई होईल -राखी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2016 15:06 IST

राखी सावंतला एका ब्रायडल शूटदरम्यान लग्न आणि मुलांबद्दल विचारले असता, त्यावर दिलेल्या तिच्या उत्तराने सर्वचजण चकितच झाले. या वयात ...

राखी सावंतला एका ब्रायडल शूटदरम्यान लग्न आणि मुलांबद्दल विचारले असता, त्यावर दिलेल्या तिच्या उत्तराने सर्वचजण चकितच झाले. या वयात लग्न कोण करेल. मात्र सरोगसीच्या सहाय्याने मी आई बनणार नाही. लग्न न करताही आई होऊन दाखवेन, असं राखी म्हणाली. राखीच्या या विधानाने पुन्हा ती एकदा चर्चेत आली आहे. ती नेहमी तिच्या वादग्रस्त विधानांसाठी चर्चेत असते. मोठ्या कालावधीनंतर राखी एक कहानी जूली या चित्रपटाच्या माध्यमातून रुपेरी पडद्यावर दिसणार आहे. हा चित्रपट शीना बोरा हत्याकांडवर आधरित आहे. यात राखी इंद्राणी मुखर्जीच्या भूमिकेत दिसणार आहे.