Join us
Daily Top 2Weekly Top 5

जीवंतपणी कोणी विचारले नाही, मेल्यानंतर सुशांतच्या आयुष्यावर सिनेमा बनवण्यासाठी दिग्दर्शकाची धडपड

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2020 15:12 IST

सुशांत एक प्रतिभावान कलाकार होता. त्याची अशी अचानक एक्झिट चटका लावणारी आहे. त्याच्या आयुष्यावर बनणारा सिनेमा त्याच्यासाठी अनोखी श्रद्धांजलीच असेल म्हणून सिनेमाची तयारीही सुरू करण्यात आली आहे.

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतने छोट्या पडद्यावरील मालिकांमध्ये काम करत अभिनयाच्या प्रवासाला सुरुवात केली होती. त्याने 'किस देस में है मेरा दिल' या मालिकेत काम केले. त्यानंतर त्याने 'पवित्र रिश्ता' या मालिकेत काम केले. या मालिकेतील मानव हे पात्र विशेष गाजले. ‘काय पो चे’, 'छिछोरो', 'एम एस धोनी' या सिनेमा दमदार भूमिका साकारणारा अभिनेता सुशांत सिंह राजपूतने १४ जून रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याने वयाच्या ३४व्या वर्षी जगाचा निरोप घेतला.  

सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर बॉलिवूडमध्ये खळबळ उडाली आहे. सुशांतने आत्महत्या का केली याबद्दल बरेच तर्कवितर्क लावण्यात येत आहेत. बॉलिवूडमधील घराणेशाही आणि कंपुशाहीला यासाठी जबाबदार ठरवले जात आहे.सुशांतला सात चित्रपटांमधून काढून टाकण्यात आले आणि नंतर या चित्रपटांमध्ये इतर अभिनेत्यांना कास्ट करण्यात आले, त्यामुळे सुशांत नैराश्येत गेला आणि त्यातूनच त्याने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले अशी चर्चा सुरु आहे.

बॉलिवूडच्या काही दिग्गज दिग्दर्शकांना आता सुशांतच्या आयुष्यावर सिनेमा बनवण्याचे वेध लागले आहेत. सुशांत एक प्रतिभावान कलाकार होता. त्याची अशी अचानक एक्झिट चटका लावणारी आहे. त्याच्या आयुष्यावर बनणारा सिनेमा त्याच्यासाठी अनोखी श्रद्धांजलीच असेल म्हणून सिनेमाची तयारीही सुरू करण्यात आली आहे.

दिग्दर्शक निखीन आनंद हा सिनेमा बनवणार असून 2022मध्ये हा सिनेमा प्रदर्शितही होणार आहे. हा सिनेमा बनवण्यासाठी लागणारा पैसा हा पब्लिक फंडच्या माध्यमातून जमा केला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. हिंदी, तमिल, तेलुगु  या तीन भाषेत हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. 'सुसाइड या मर्डरः ए स्टार वॉज लॉस्ट' असे या सिनेमाचे नाव असणार आहे.

टॅग्स :सुशांत सिंग रजपूत