Join us
Daily Top 2Weekly Top 5

वीर दासने दिल्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2017 17:14 IST

अभिनेता वीर दासने सीबीएसईच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षार्थींना शुभेच्छा दिल्या आहेत.वीरने फेसबुकवर आपले १२ वीचे गुणपत्रक शेअर केले ...

अभिनेता वीर दासने सीबीएसईच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षार्थींना शुभेच्छा दिल्या आहेत.वीरने फेसबुकवर आपले १२ वीचे गुणपत्रक शेअर केले आहे. त्याखाली फोटोओळही दिली आहे. ‘जे विद्यार्थी बोर्ड परीक्षेला सामोरे जात आहेत, त्यांना शुभेच्छा. मी फारसा हुशार नव्हतो, किंवा अभ्यासही करीत नव्हतो. परंतु मी सहा गोष्टी शिकलो. त्या मी तुमच्यासोबत शेअर करतो आहे. विशेषत: वीरने दिलेल्या या शुभेच्छा मुलांना अधिक आवडल्या. सामाजिक माध्यमांमध्ये याची चर्चाही सुरू आहे. ‘मी इथे लिहिण्यापूर्वी सांगतो, तुमच्या ज्या काही शंका असतील, त्या तुम्ही मनात ठेवा. ज्यांना अधिक तणाव असेल त्यांनी एक लक्षात ठेवा, तुम्हाला जे योग्य वाटते ते लिहा.’ असेही तो म्हणतो.अनेकांनी वीरच्या या भूमिकेचे कौतुक केले. मुलांना पाठिंब्यासाठी तुम्ही पुढे आला. विद्यार्थ्यांना अशाच गोष्टीची गरज असते, असेही काहींनी म्हटले आहे.