Join us
Daily Top 2Weekly Top 5

मलायका अरोराची ही इच्छा राहिली अपूर्ण, 'सुपर डान्सर ४' शोमध्ये केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2021 18:35 IST

मलायका अरोरा बऱ्याचदा तिच्या ग्लॅमरस फोटोंमुळे तर कधी अर्जुन कपूरसोबतच्या नात्यामुळे चर्चेत येत असते.

बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा बऱ्याचदा तिच्या ग्लॅमरस फोटोंमुळे तर कधी अर्जुन कपूरसोबतच्या नात्यामुळे चर्चेत येत असते. भलेही मलायका आणि अरबाज खानचा घटस्फोट झाला असला तरी ते त्यांचा मुलगा अरहानची खूप काळजी घेतात. अरहान आता १८ वर्षांचा झाला आहे. मात्र मलायकाने नुकतेच तिच्या एका इच्छेबद्दल सांगितले, जी पूर्ण होऊ शकली नाही. मलायका लवकरच छोट्या पडद्यावरील डान्सिंग रिएलिटी शो सुपर डान्सर ४मध्ये झळकणार आहे.

'सुपर डान्सर'च्या चौथ्या सीझनमध्ये परीक्षकाची भूमिकेत अभिनेत्री शिल्पा शेट्टी दिसणार होती. मात्र आता शिल्पाच्या जागी अभिनेत्री मलायका अरोराची वर्णी लागली आहे. शिल्पाच्या जागी या आठवड्यात मलायका परीक्षक म्हणून भूमिका बजावणार आहे.

दरम्यान शोमध्ये स्पर्धांनी एकापेक्षा एक डान्स सादर करून सर्वांचे मन जिंकले. पण अवघ्या ६ वर्षाच्या फ्लोरिना गोगोईने तिच्या नृत्य कौशल्याने मलायकाला थक्क केले. नृत्य सादरीकरणानंतर मलायकाने फ्लोरिनाला जवळ घेतले आणि तिचे खूप कौतुक केले. 

त्यावेळी मलायका अरोराने तिच्या एका इच्छेबद्दल सांगितले. ती म्हणाली की, मला एक मुलगी हवी होती. मलायका पुढे म्हणाली, 'मी तुला घरी घेवून जाऊ? माझ्या घरी एक मुलगा आहे. फार पूर्वी मी म्हणायची मला एक मुलगी असती तर? माझ्याकडे सुंदर कपडे आणि चपला देखील आहेत. पण त्या घालायला कोणी नाही.' त्यानंतर मलायकाने फ्लोरिनाला घट्ट मिठी मारली.

टॅग्स :मलायका अरोरासुपर डान्सर