सोहेल साकारणार लहान भावाची भूमिका ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2016 09:57 IST
सलमान खान आणि त्याचा भाऊ सोहेल खान यांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. त्यातला अविस्मरणीय चित्रपट म्हणजे ‘मैंने ...
सोहेल साकारणार लहान भावाची भूमिका ?
सलमान खान आणि त्याचा भाऊ सोहेल खान यांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. त्यातला अविस्मरणीय चित्रपट म्हणजे ‘मैंने प्यार क्यूँ किया?’ आता ते पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहेत.कबीर खान याचा आगामी चित्रपट ‘ट्यूबलाईट’ विषयी सध्या बरेच बोलले जात आहे. यात म्हणे सोहेल खान सलमानच्या लहान भावाची भूमिका साकारणार आहे. कबीर आणि सलमान यांचा हा ‘एक था टायगर’ आणि ‘बजरंगी भाईजान’ नंतर तिसरा चित्रपट एकत्र असणार आहे.कबीर चित्रपटाची शूटींग लडाख आणि मुंबईत करणार आहे. ५० व्या दशकातील हे कथानक असणार आहे तसेच सोहेल मुक मुलाची भूमिका करणार आहे.