Join us

​काजोलच्या गुप्त या चित्रपटाचा सिक्वल येणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2017 12:12 IST

काजोलचा गुप्त हा चित्रपट प्रचंड गाजला होता. या चित्रपटातील तिच्या भूमिकेचे तर विशेष कौतुक झाले होते. काजोलने अनेक चित्रपटांमध्ये ...

काजोलचा गुप्त हा चित्रपट प्रचंड गाजला होता. या चित्रपटातील तिच्या भूमिकेचे तर विशेष कौतुक झाले होते. काजोलने अनेक चित्रपटांमध्ये नायिकेची भूमिका साकारली आहे. पण गुप्त या चित्रपटात काजोल नायिकेच्या नव्हे तर खलनायिकेच्या भूमिकेत झळकली होती आणि तिची ही भूमिका तिच्या चाहत्यांना खूप आवडली होती. या चित्रपटासाठी तिला अनेक पुरस्कार देखील मिळाले होते. गुप्त हा चित्रपट प्रचंड गाजला असल्यामुळे या चित्रपटाचा आता प्रेक्षकांना सिक्वल पाहायला मिळणार असल्याचे म्हटले जात आहे.गुप्त या चित्रपटाचा सिक्वल येणार असल्याची गेल्या कित्येक दिवसांपासून चर्चा आहे, त्यामुळे या चित्रपटाचे फॅन्स प्रचंड खूश आहेत. या चित्रपटाच्या सिक्वलबाबत काजोलला नुकत्याच एका मुलाखतीदरम्यान विचारण्यात आले होते. त्यावर तिने खूपच छान उत्तर दिले आहे. या चित्रपटाच्या सिक्वलबाबत ती सांगते, आता चित्रपटाच्या सिक्वलमध्ये मी बॉबीला मारून टाकू असे तुम्हाला वाटत आहे की माझी आत्मा येऊन बॉबीला मारेल असे तुम्हाला वाटते किंवा माझी मुलगी या सगळ्याचा बदला घेईल अशी कथा तुम्हाला सिक्वलमध्ये पाहायची आहे. चित्रपटाचा सिक्वल आला तर कथा काहीशी अशीच असू शकते. पण या चित्रपटाचा सिक्वल येईल असे मला वाटत नाही. गुप्तमध्ये काजोलसोबतच बॉबी देओल आणि मनिषा कोईराला यांच्या मुख्य भूमिका होत्या. या दोघांचा अभिनयदेखील प्रेक्षकांना आवडला होता. पण या चित्रपटाचा सिक्वल येणार नसल्याचे सांगून काजोलने या चित्रपटाच्या चाहत्यांची नक्कीच निराशा केली आहे. सध्या सगळ्याच चित्रपटांचे रिमेक आणि सिक्वल पाहायला मिळत आहे. एखादा चित्रपट हिट झाला की लगेचच त्या चित्रपटाच्या सिक्वलची घोषणा केली जाते. तसेच एखाद्या जुन्या हिट चित्रपटाचा रिमेक बनवण्याचा ट्रेंडच बॉलिवूडमध्ये आला आहे. या ट्रेंडविषयी काजोल सांगते, माझ्यामते तरी कोणत्याही चित्रपटाचा सिक्वल येऊ नये की कोणत्याही चित्रपटाचा रिमेक केला जाऊ नये. काजोलला चित्रपटाचा सिक्वल बनवला जात असल्याचे आवडत नसल्याने काजोलच्या कोणत्याही चित्रपटाचा सिक्वल तिच्या फॅन्सना पाहायला मिळणे हे अशक्य आहे. Also Read : जेव्हा विमानतळावर अचानकच युवराज सिंग अन् काजोलचा झाला सामना, तेव्हा काहीसे असे घडले!