चाहत्यांना आवडेल का ‘छन्ना मेरेया’?
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2016 17:06 IST
पाकिस्तानी कलाकारांमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकलेला बहुचर्चित चित्रपट ‘ऐ दिल हैं मुश्किल’ची टीम आता चाहत्यांचा प्रतिसाद कसा मिळेल? या द्विधा ...
चाहत्यांना आवडेल का ‘छन्ना मेरेया’?
पाकिस्तानी कलाकारांमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकलेला बहुचर्चित चित्रपट ‘ऐ दिल हैं मुश्किल’ची टीम आता चाहत्यांचा प्रतिसाद कसा मिळेल? या द्विधा मन:स्थितीत दिसते आहे. ‘बुलैया’ या गाण्यानंतर आता एकतर्फी प्रेमाची कहानी मांडणारे ‘छन्ना मेरेया’ हे गाणे आऊट झाले आहे.पाकिस्तानी कलाकारांवरून निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर चित्रपटातील या दोन्ही गाण्यांवरही टीका होत आहे. अशातच काल आऊट झालेले ‘छन्ना मेरेया’ हे गाणे चाहत्यांना आवडेल का? हा प्रश्न आहे. हे गाणे रणबीर अनुष्कासाठी गातांना दिसतो आहे.‘छन्ना मेरेया’ म्हणजे ‘माझी प्रेयसी’. अलिझा (अनुष्का)ला अखेर अयानचे (रणबीर) प्रेम तिला कळते आणि फवादला ते दोघे भेटतात. पण, फवाद म्हटल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांचा वाद आलाच, तेव्हा हा वाद किती टोकाला जातो हे पाहूयात.