२४ चा तिसरा सिझन करणारच - अनिल कपूर
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2016 13:42 IST
२४ या मालिकेद्वारे अभिनेता अनिल कपूरने छोट्या पडद्यावर पदार्पण केले. या मालिकेचा पहिला सिझन प्रचंड गाजला होता. तीन वर्षांच्या ...
२४ चा तिसरा सिझन करणारच - अनिल कपूर
२४ या मालिकेद्वारे अभिनेता अनिल कपूरने छोट्या पडद्यावर पदार्पण केले. या मालिकेचा पहिला सिझन प्रचंड गाजला होता. तीन वर्षांच्या गॅपनंतर या मालिकेचा दुसरा सिझन आता येत आहे. दुसऱया सिझनमध्ये प्रेक्षकांना पहिल्या सिझनपेक्षा अधिक अॅक्शन पाहायला मिळणार आहे आणि या सिझनची कथा अधिक रंजक आहे असे अभिनेता अनिल कपूरचे म्हणणे आहे. आपल्या या नव्या मालिकेबाबत अनिलने सीएनएक्ससोबत मारलेल्या गप्पा...अनिल मालिकेचा पहिला सिझन २०१२ साली आला होता, दुसऱ्या सिझनसाठी येवढा वेळ का लागला?कोणत्याही गोष्टीला १०० टक्के देता येत असेल तरच ती गोष्ट करायची असे माझे वैयक्तिक मत आहे. त्यामुळे २४ चा दुसरा सिझन करत असताना दुसरे काहीही करायचे नाही असे मी ठरवलेले होते. २४चा पहिला सिझन संपल्यानंतर मी वेलकम बॅक, दिल धडकने दो या दोन चित्रपटांच्या चित्रीकरणामध्ये व्यग्र होतो. या दोन्ही चित्रपटाच्या प्रदर्शनानंतरच २४ वर काम करायला सुरुवात केली.२४मध्ये केवळ तू अभिनय करत नसून या मालिकेची निर्मितीही तुझीच आहे. एक निर्माता म्हणून या मालिकेच्या कोणकोणत्या गोष्टींमध्ये तुझा सहभाग असतो?मी मालिकेच्या पटकथेत काही बदल सुचवले आहेत. तसेच कलाकारांच्या निवडीच्या बाबतीतही एखादी कलाकार एखाद्या व्यक्तिरेखेसाठी योग्य आहे असे मला वाटल्यास मी ती गोष्ट माझ्या टीमला सांगितली आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे मी माझा पूर्ण वेळ २४ला द्यायचे ठरवले असल्यामुळे मी टीममधील मंडळींना कोणत्याही वेळात भेटायला तयार असायचो. त्यांच्यासोबत छोट्या ना छोट्या गोष्टींबद्दल मी चर्चा केलेली आहे. कोणत्याही मालिकेसाठी टीआरपी हा किती महत्त्वाचा असतो असे तुला वाटते?टिआरपीच्या गोष्टी खरे तर मला अजिबातच कळत नाही. माझ्यासाठी माझ्या फॅन्सने दिलेली पावती ही सगळ्यात महत्त्वाची असते. २४ आम्हाला आवडत नाही असे सांगणारी एकही व्यक्ती मला अद्याप तरी भेटलेली नाही. गेले ३८ वर्षं मी या क्षेत्रात आहे. कोणता चित्रपट हिट झाला अथवा फ्लॉप झाली तरी माझ्या फॅन्सचे माझ्यावरचे प्रेम कमी होत नाही. त्यामुळे टिआरपी या गोष्टीचा माझ्यावर तरी परिणाम होत नाही.२४ सिझन दोनचा प्रवास तुझ्यासाठी कसा होता?२४ साठी मी गेल्या वर्षंभरात कोणतेही दुसरे प्रोजेक्ट साईन केलेले नाही. मी माझे पूर्ण लक्ष एकाच मालिकेवर केंद्रित केलेले आहे. नोव्हेंवरपासून सतत मी या मालिकेचे चित्रीकरण करत आहे. या मालिकेसाठी मी माझा कित्येक वर्षांनी लूकही बदलला आहे. जयसिंग राठोड या व्यक्तिरेखेसाठी दाढीही वाढवलेली आहे. मी ही मालिका पैशांसाठी कधीच करत नाही. या मालिकेमुळे मला एक वेगळ्याच प्रकारचा आनंद आणि समाधान मिळते. तू पूर्वी हमाल दे धमाल या मराठी चित्रपटात काम केले होते. मराठीत पुन्हा काम करण्याचा काही विचार आहे का?मी चेंबूरमध्ये लहानाचा मोठा झालो आहे. मराठी ही भाषा माझ्यासाठी खूप जवळची आहे. माझे अनेक मित्रही मराठी आहेत. त्यामुळे मला खूप चांगले मराठी बोलता येते. मराठी चित्रपट दिवसेंदिवस खूप चांगली प्रगती करत आहे. त्यामुळे मराठीत लवकरच काम करायचे असे मी ठरवले आहे. २४ नंतर तुझे कोणते प्रोजेक्ट येणार आहेत?मी एका इंटरनॅशनल प्रोजेक्टमध्ये काम करत असून त्याचे चित्रीकरण जुलैनंतर सुरू होणार आहे. तसेच नाना पाटेकर यांच्यासोबत मी पुन्हा एकदा एक चित्रपट करणार आहे. २४ च्या तिसऱ्या सिझनचा काही विचार केला आहेस का?२४ या मालिकेचा दुसरा सिझन प्रेक्षकांना आवडला तर आम्ही नक्कीच तिसऱ्या सिझनचा विचार करणार आहोत. मला स्वतःला तिसऱ्या सिझनची नक्कीच उत्सुकता आहे.