बॉलिवूडचे ‘बाहुबली ग्रहण’ कधी सुटणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2017 14:05 IST
‘बाहुबली2’नंतर बॉलिवूड एका ‘हिट’साठी आसुरलेले आहे. ‘बाहुबली2’नंतर बॉलिवूडचा एकही सिनेमा बॉक्सआॅफिसवर टिकू शकलेला नाही. यंदा २८ एप्रिलला रिलीज झालेल्या ...
बॉलिवूडचे ‘बाहुबली ग्रहण’ कधी सुटणार?
‘बाहुबली2’नंतर बॉलिवूड एका ‘हिट’साठी आसुरलेले आहे. ‘बाहुबली2’नंतर बॉलिवूडचा एकही सिनेमा बॉक्सआॅफिसवर टिकू शकलेला नाही. यंदा २८ एप्रिलला रिलीज झालेल्या ‘बाहुबली2’ने अभूतपूर्व यश मिळवले. चित्रपटाने आत्तापर्यंत १७०० कोटी रूपयांचा बिझनेस केला. मात्र यानंतर एकही चित्रपट सुपरहिट ठरू शकलेला नाही.एप्रिल ते ४ आॅगस्टपर्यंत लहान-मोठे मिळून सुमारे ३० बॉलिवूड चित्रपट रिलीज झालेत. मात्र यापैकी कुठल्याही चित्रपटाला बॉक्सआॅफिसवर आपला धाक जमवता आला नाही.सलमान खान, शाहरूख खान अशा बड्या बड्यांचे चित्रपटही दणकून आपटले. सलमान खानचा ‘ट्युबलाईट’आणि शाहरूख खानचा ‘जब हॅरी मेट सेजल’ या चित्रपटाकडून मोठी अपेक्षा होती. पण या दोन्ही चित्रपटांनी निराशा केली. अशात अक्षय कुमारचा ‘टॉयलेट : एक प्रेमकथा’ हा चित्रपट येत्या शुक्रवारी रिलीज होतो आहे. अक्षयच्या या चित्रपटाने तरी ‘बाहुबली2’ने लावलेले ग्रहण सुटते का, हे पाहणे इंटरेस्टिंग ठरणार आहे. आता अक्षयकडून अपेक्षा येत्या ११ आॅगस्टला अक्षय कुमारचा ‘टॉयलेट : एक प्रेमकथा’ हा चित्रपट रिलीज होतो आहे. १८ कोटी रुपए खर्चून साकारलेल्या या चित्रपटाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अक्षय कुमारच्या अनेक कमी बजेटच्या चित्रपटांनी बॉक्सआॅफिसवर चांगले प्रदर्शन केले. प्रत्येक रूपात तो बॉक्सआॅफिसवरचा एक भरवशाचा ‘खिलाडी’ ठरला आहे. त्यामुळेच हा चित्रपट तरी बॉलिवूडचे ग्रहण सोडवू शकतो का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.सरकार-३ ‘सरकार’ फ्रेन्चाइजीचा ‘सरकार-३’ हा तिसरा चित्रपट. राम गोपाल वर्मा यांचा हा चित्रपट ‘बाहुबली2’ रिलीज झाल्याच्या दोन आठवड्यांनंतर रिलीज झाला. पण ‘बाहुबली2’ने प्रेक्षकांवर असे काही गारूड केले की, लोकांनी ‘सरकार-३’कडे बघितलेदेखील नाही. बॉक्सआॅफिसवर हा चित्रपट केवळ ९.६० कोटी रूपयांची कमाई करू शकला.मेरी प्यारी बिंदू आयुष्यमान खुराणा आणि परिणीती चोप्रा यांचा ‘मेरी प्यारी बिंदू’ हा चित्रपटही ‘बाहुबली2’च्या लाटेसोबत वाहून गेला. समीक्षकांच्या मते, चित्रपटाच्या कथेत दम नव्हता. या चित्रपटाने केवळ ९.५० कोटी रूपयांचा बिझनेस केला.राबता जूनच्या दुस-या आठवड्यात रिलीज झालेला सुशांत सिंह राजपूत व क्रिती सॅनन यांचा ‘राबता’ हा चित्रपटही बॉक्सआॅफिसवर दणकून आपटला. जूनपर्यंत ‘बाहुबली2’ या चित्रपटाचीच बॉक्सआॅफिसवर धूम होती. त्यामुळे ‘राबता’ही आपटला. या चित्रपटाने केवळ २४.५ कोटींचा गल्ला जमवला.ट्युबलाईट ‘ट्युबलाईट’ या सलमान खानच्या चित्रपटाने यंदा सर्वांत मोठा धक्का दिला. या चित्रपटाकडून बºयाच अपेक्षा होत्या. पण हा चित्रपट फ्लॉप ठरला.जग्गा जासूस अनुराग बसूचा ‘जग्गा जासूस’ हा चित्रपटही प्रेक्षकांना आकर्षित करू शकला नाही. रणबीर कपूर व कॅटरिना कैफ या एक्स कपलची हॉट केमिस्ट्रीही प्रेक्षकांवर परिणाम करू शकली नाही. गत १४ जुलैला रिलीज झालेल्या या चित्रपटाने केवळ ५३.३८ कोटी जमवले.मुन्ना मायकल टायगर श्रॉफचा ‘मुन्ना मायकल’ हा चित्रपटही आपटला. डान्स, म्युझिक, अॅक्शन, रोमान्स असा सगळा मसाला असूनही या चित्रपटाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली. या चित्रपटाने केवळ ३३.१२ कोटी रुपए कमावले.जब हॅरी मेट सेजल शाहरूख खानचा ‘जब हॅरी मेट सेजल’ हा चित्रपटही फ्लॉप चित्रपटांच्या क्लबमध्ये जावून बसला. ओपनिंग वीकेंडमध्ये या चित्रपटाने केवळ ४६.२३ लाख रूपयांची कमाई केली. या चित्रपटाची लागत ८० कोटी रुपए आहे. अजूनही हा चित्रपट स्क्रीनवर असला तरी प्रेक्षकांनी त्याला कधीचेच नाकारले असल्याने ही ८० कोटींची लागत निघणेही कठीण वाटते आहे.