संजय दत्तच्या पुतणीला मिळू शकेल का बॉलिवूड एन्ट्री?
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2016 18:59 IST
संजय दत्तच्या मामेभावाची मुलगी नाझिया हुसैन सध्या बॉलिवूड प्रवेशासाठी प्रयत्नात असून आपण सर्वसाधारण मुलीप्रमाणे मेहनत घेत असल्याचे तिने म्हटले ...
संजय दत्तच्या पुतणीला मिळू शकेल का बॉलिवूड एन्ट्री?
संजय दत्तच्या मामेभावाची मुलगी नाझिया हुसैन सध्या बॉलिवूड प्रवेशासाठी प्रयत्नात असून आपण सर्वसाधारण मुलीप्रमाणे मेहनत घेत असल्याचे तिने म्हटले आहे. नाझियाने ‘आशिकी-२’ या तमीळ रिमेकने अभिनवाच्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. २००६ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘टॉम डिक हॅरी’च्या सिक्वलमध्ये सध्या ती काम करत आहे. ध्येय गाठण्याच्या ध्यासाने भारलेली मी एक सामान्य अभिनेत्री आहे. आॅडिशनसाठी मी रांगेत उभी राहते, लोकल ट्रेनने प्रवास करते आणि सर्वसामान्यांप्रमाणे मेहनत करत असून, मला याचा अभिमान आहे, असे ती म्हणाली. ‘टॉम डिक हॅरी’च्या सिक्वलबाबत विचारले असता, ही आपल्यासाठी सुरुवात असून आपण खूप उत्सुक असल्याचे ती म्हणाली.