एमी दिसणार ‘हाफ गर्लफ्रेंड’ मध्ये ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2016 10:05 IST
‘हाफ गर्लफ्रेंड’ मध्ये तर श्रद्धा कपूर आहे ना? मग एमी जॅक्सन कशी काय यात ? असे वाटले ना तुम्हाला! ...
एमी दिसणार ‘हाफ गर्लफ्रेंड’ मध्ये ?
‘हाफ गर्लफ्रेंड’ मध्ये तर श्रद्धा कपूर आहे ना? मग एमी जॅक्सन कशी काय यात ? असे वाटले ना तुम्हाला! वेल, श्रद्धा तर असणारच आहे या चित्रपटात पण एमी देखील एका छोट्याशा भूमिकेसाठी चित्रपटात दिसणार आहे.‘सिंग इज ब्लिंग’ मध्ये अक्षय कुमार सोबत अतिशय उत्कृष्ट भूमिका केलेली एमीला आता बॉलीवूडमध्ये खुप प्रोजेक्ट्स मिळू लागले आहेत. ती अर्जुन कपूर आणि श्रद्धा कपूरच्या ‘हाफ गर्लफ्रेंड’ मध्येही दिसणार म्हटल्यास तिची चांगलीच चर्चा होणार यात काही शंकाच नाही.एमी समांथा मेयर्स या बिल गेट्स फाऊंडेशन मधून भारताच्या ग्रामीण भागात शाळांना निधी देण्याच्या विचाराने आलेली दाखवण्यात येते. त्यातील एक शाळा बिहार, बुक्सारमध्ये माधवची आई रानी साहिबा चालवत असते.चित्रपटाच्या दुसºया भागात एमीची खुप महत्त्वाची भूमिका असणार आहे. सध्या चित्रपटाचे शूटींग दिल्लीत सुरू आहे.