Join us

​आमिर खान राजकारणात येणार काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2017 14:51 IST

आमिर खान याचा आज (१४ मार्च) वाढदिवस. आज आमिरने  मीडियासोबत वाढदिवसाचा आनंद साजरा केला. बर्थ डे सेलिब्रेशन, तेही मीडियासोबत ...

आमिर खान याचा आज (१४ मार्च) वाढदिवस. आज आमिरने  मीडियासोबत वाढदिवसाचा आनंद साजरा केला. बर्थ डे सेलिब्रेशन, तेही मीडियासोबत म्हटल्यानंतर प्रश्नोत्तराचा एक ‘तास’ रंगणारच. मग काय, पर्सनल ते पॉलिटिकल अशा सगळ्या श्रेणीतले प्रश्न आमिरला विचारले गेलेत. यात सगळ्यात महत्त्वाचा ठरला तो राजकारणावरचा प्रश्न. अर्थात याला कारणही आहे. केवळ पडद्यावरच नाही तर पडद्याबाहेरही आमिर खान कार्यकर्त्याच्या भूमिकेत दिसत आलाय. सामाजिक व्यासपीठावर त्याचे अशा कार्यकर्ता स्टाईल वागण्यामागे राजकीय महत्त्वाकांक्षा असावी, असा अनेकांचा अंदाज होता. पण खुद्द आमिरने हा अंदाज खोटा ठरवला आहे. होय, राजकारणात येण्याचा माझा कुठलाही इरादा नाहीय, असे त्याने स्पष्ट कले आहे. राजकारण माझ्यासाठी नाहीय. माझ्या मते, मी कलेच्या क्षेत्रातच उत्तम काम करू शकतो. एक कलाकार, एक रचनात्मक व्यक्ति याच नात्याने मी समाज व देशाची सेवा करू इच्छितो. मी जिथे आहे, तिथे राहू इच्छितो. कलाकार ही ओळख मला पुसायची नाही, असे आमिरने सांगितले.ALSO READ : Birthday special : आमिर खानच्या अनौरस मुलाबाबत तुम्हाला माहीत आहे का?मी कायम विविध मुद्यांवर बोलताना संयम बाळगला आहे. विचारपूर्वक बोलण्याचा माझा प्रयत्न आहे. पुढेही माझा हाच प्रयत्न असेल. सामाजिक मुद्यांवर मी बोललो, पुढेही बोलत राहील. पण कुणी याला राजकारणाशी जोडून पाहू नये, असेही त्याने सांगितले. आता आमिरने इतके स्पष्ट स्पष्ट सांगितल्यावर तरी आपण विश्वास ठेवायलाच हवा ना?अलीकडे आलेला आमिर खानचा ‘दंगल’ हा सिनेमा सुपरडुपर हिट ठरला. यातील आमिरच्या भूमिकेचे प्रचंड कौतुक झाले. सध्या आमिर ‘ठग्स आॅफ हिंदोस्तान’ या चित्रपटात बिझी आहे.