का केले सोनाक्षीने अर्जूनकडे दुर्लक्ष??
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2016 16:52 IST
अलीकडे एका चॅरिटी फुटबॉल मॅचदरम्यान ‘दबंग गर्ल’ सोनाक्षी सिन्हा हिने अर्जून कपूरकडे साफ दुर्लक्ष केले. बॉलिवूड स्टार आणि क्रिकेटपटूंमध्ये ...
का केले सोनाक्षीने अर्जूनकडे दुर्लक्ष??
अलीकडे एका चॅरिटी फुटबॉल मॅचदरम्यान ‘दबंग गर्ल’ सोनाक्षी सिन्हा हिने अर्जून कपूरकडे साफ दुर्लक्ष केले. बॉलिवूड स्टार आणि क्रिकेटपटूंमध्ये फुटबॉल मॅच रंगणार होती. सोनाक्षी, अमिताभ बच्चन, शिल्पा शेट्टी यांच्यासह बॉलिवूडमधील अनेकजण बॉलिवूड प्लेअर्सला चीअर अप करण्यासाठी पोहोचले होते. तर अर्जून फुटबॉल मॅच खेळत होता. यावेळी सोनाक्षी तिचा जवळचा मित्र बंटी सजदेह याच्यासोबत मॅच पाहायला पोहोचली. (बंटी हा सोनाक्षीचा एक्स बॉयफ्रेन्डही मानला जातो) सोनाक्षीने मॅच फुल्ल एन्जॉय केली. तिथून बाहेर पडताना सर्व खेळाडूंना विश करण्यासाठी सोनाक्षी पोहोचली. पण याचवेळी तिचा बदलेला अंदाज पाहून सगळेच चाट पडले. रणबीर कपूर, आदित्य रॉय कपूर, अभिषेक बच्चन अशा सर्व खेळाडूंना सोनाक्षी भेटली. पण तिथे अर्जून कपूर असूनही सोनाक्षीने त्याच्याकडे साफ दुर्लक्ष केले. तिच्यासमोर अर्जून आलाही पण त्याच्याकडे एक साधा कटाक्षही न टाकता सोनाक्षी तिथून निघून गेली. अर्जूननेही सोनाक्षीशी स्वत:हून बोलण्याची तसदी घेतली नाही. आता सोनाक्षी असे का वागली तर भूतकाळ...(?) होय, सोनाक्षी व अर्जूनच्या अफेअरच्या बातम्या मध्यंतरी चर्चेत आल्या. मात्र का कुणास ठाऊक, आता स्थिती बदललेली दिसतेय. अर्जून व सोनाक्षी एकमेकांना टाळू लागले आहेत. आता त्यांना एकमेकांकडे पाहणेही पसंत नाही...