Join us

‘फुल आॅन अ‍ॅक्शन’मधील कॅटरिना कैफचा हा फोटो का होत असेल व्हायरल?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2017 21:16 IST

अभिनेत्री कॅटरिना कैफ हिचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. फोटोमध्ये कॅट फुल आॅन अ‍ॅक्शनमध्ये दिसत ...

अभिनेत्री कॅटरिना कैफ हिचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. फोटोमध्ये कॅट फुल आॅन अ‍ॅक्शनमध्ये दिसत आहे. कॅटरिनाने एक मोठी गन हातात घेतली असून, या गनच्या माध्यमातून शेकडो गोळ्या क्षणार्धात फायरिंग करता येऊ शकतात. कॅटचा हा फोटो ‘टायगर जिंदा है’चे दिग्दर्शक अली अब्बास जफर यांनी शेअर केला आहे. त्यामुळे स्वाभाविकच हा फोटो ‘टायगर जिंदा है’ या चित्रपटाशी संबंधित आहे. असो, हा फोटो बघून एक गोष्ट स्पष्ट होते ती म्हणजे ‘टायगर जिंदा है’ हा चित्रपट केवळ दबंग सलमान खानवरच अवलंबून नाही तर कॅटरिनादेखील हा चित्रपटाचा एक महत्त्वपूर्ण भाग आहे. त्यामुळे कॅटच्या चाहत्यांना यावेळेस जोयाचा अवतार खूपच डॅशिंग दिसेल यात शंका नाही. दरम्यान, याअगोदरदेखील कॅटरिनाचे चित्रपटाशी संबंधित बरेचसे फोटो शेअर करण्यात आले आहेत. तिचे हे सर्व फोेटो लोकांना प्रचंड पसंत आले आहेत. त्यामुळे आता प्रेक्षकांना या चित्रपटाची प्रतीक्षा लागली आहे. तब्बल पाच वर्षांनंतर कॅट आणि सलमान एकत्र झळकणार असल्याने त्यांच्यातील लव्ह केमेस्ट्री बघण्यास प्रेक्षक आतुर आहेत. सध्या दोघेही चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. चित्रपटाचे वैशिष्ट्य म्हणजे ‘एक था टायगर’ हा चित्रपट स्पाय थ्रिलर होता, परंतु त्यास दोन गुप्तहेरांची प्रेम कथा अशा स्वरूपात दाखविण्यात आले होते. आता ‘टायगर जिंदा है’ भारतीय नर्सोच्या रेस्क्यू आॅपरेशनच्या सत्य कथेवर आधारित आहे. त्यामुळे सलमान-कॅटची जोडी या चित्रपटातून काय करिष्मा दाखविणार हे बघणे औत्सुक्याचे ठरेल. सलमान आणि कॅटचा हा चौथा चित्रपट असून, दोघांमधील लव्ह केमिस्ट्री नेहमीच चर्चेचा विषय राहिली आहे.