Join us

सिनेमाच्या बदल्यात निर्माता म्हणायचे ‘एक रात्र’ म्हणून सोडले बॉलिवूड, अभिनेत्रीचा ‘खळबळजनक’ खुलासा !

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2020 17:21 IST

2004 साली मर्डर या सिनेमात बोल्ड भूमिका केल्यामुळे आपल्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. आणि प्रत्येक निर्माता आणि दिग्दर्शक आपल्याकडून वैयक्तिक आयुष्यात याच गोष्टींची मागणी करायला लागले. 

मल्लिका शेरावत बॉलिवूडपासून काहीशी लांब असली तरीही सोशल मीडियावर मात्र ती कमालीची अॅक्टिव्ह असते.कायम वेगवेगळ्या पोस्ट ती टाकत असते. सुरूवातीपासूनच ती बोल्ड आणि बिनधास्त असून प्रत्येक गोष्टीवर ती परखड मत मांडते. 2004 साली मर्डर या सिनेमात बोल्ड भूमिका केल्यामुळे आपल्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. आणि प्रत्येक निर्माता आणि दिग्दर्शक आपल्याकडून वैयक्तिक आयुष्यात याच गोष्टींची मागणी करायला लागले. 

ही तडजोड करायला नकार दिल्यानेच अनेक सिनेमे हातचे गेल्याची कबुली तिने दिली होती. सिनेमाच्या ऑफर्स यायच्या त्या सगळ्या अशाच बोल्ड भूमिका असायच्या. हॉट सिन आणि छोटे कपडे घालेल तर फक्त तिच्या मर्जीने, इतरांच्या इच्छेप्रमाणे करणार नाही. मल्लिकालाही  काही प्रसिद्ध इंडस्ट्रीतील लोकांची भीती वाटत होती कारण  त्यामुळे बॉलिवूडमध्ये काम करणे कठीण जात असल्याचे तिने सांगितले होते.

मला एका प्रोजेक्टमधून बाहेर काढलं, कारण मी को-स्टार हिरोला नकार दिला. तू माझ्याशी जवळीक का साधत नाही? ऑनस्क्रीन जवळ येऊ शकतेस मग एकांतात का नाही?  असा सवाल को-स्टारने विचारल्यावर मी त्याला नकार दिला. त्यामुळे चांगला प्रोजेक्ट हातातून गेला. आपण ज्याप्रमाणचे कॅरेक्टर करतो त्याप्रमाणेच आपल्याला समजलं जातं. ऑनस्क्रीन बोल्ड दिसत असलो तर ती व्यक्ती खऱ्या आयुष्यात देखील तशीच असते असा समज होतो.

टॅग्स :मल्लिका शेरावत