Join us
Daily Top 2Weekly Top 5

इटलीच्या रस्त्यावर लोळून रडण्याची का वेळ आली होती संजय दत्तवर, जाणून घ्या हा किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2020 13:21 IST

असं काय झालं होतं की संजय दत्तला रस्त्यावर लोळून रडावं लागलं होतं. संजय दत्तचा हा किस्सा फार कमी लोकांना माहित आहे.

बॉलिवूडचा संजूबाबा म्हणजेच अभिनेता संजय दत्तच्या जीवनातील अनेक किस्से सगळ्यांच्याच परिचयाच्या आहेत. बालपणीची कथा असेल किंवा तरूणपणातील अफेयर्सचे किस्से... संजय दत्तच्या जीवनात बरेच चढउतार आले आहे. त्याचे जीवन नेहमीच खुल्या पुस्तकासारखं आहे. मात्र संजय दत्तच्या बालपणीचा एक इंटरेस्टिंग किस्सा फार कमी लोकांना माहित असेल.

हा किस्सा आहे संजय दत्त 3 वर्षांचा होता तेव्हाचा. अनेक वर्षांपूर्वी त्याने हा किस्सा एका शोमध्ये सांगितला होता.  वडील सुनील दत्त यांनी हा किस्सा संजयला सांगितला होता. तेव्हा सुनील दत्त यांनी सांगितले होते की, त्यांचा मुलगा बालपणापासून खूप हट्टी राहिला आहे. जी गोष्ट पाहिजे ती मिळाल्याशिवाय तो शांत बसत नाही. संजय दत्तच्या हट्टीपणाचा एक किस्सा सुनील दत्त यांनी सांगितला होता. 

सुनील दत्त म्हणाले होते, आम्ही इटलीला गेलो होतो. एका इटालियन माणसासोबत माझी मिटिंग होती. आम्ही एका कॉफी आउटलेटवर बसलो होतो. तेव्हाच संजयची नजर एका घोडोगाडीवर पडली. यानंतर तो हट्ट करू लागला की घोडागाडीत बसायचे आहे.

सुनील दत्त पुढे म्हणाले होते की, मी आणि नरगिसने नकार देत तिथे घोडागाडीत जाणे शक्य नसल्याचे सांगितले. रागात येऊन संजय रस्त्यावर लोळू लागला. तेथील इटालियन लेडीज संजयला पहात होत्या. त्या म्हणाल्या अरे देवा किती निर्दयी पालक आहेत. मुलाला रडवत आहेत. त्यांना मुलाची काळजी नाही. हे ऐकल्यावर माझी बायको नरगिसला खूप लाजल्यासारखे वाटले. यानंतर मिटिंग सुरू असलेल्या माणसाला हा सगळा प्रकार लक्षात आला आणि तेव्हा त्याने आमची मिटिंगही घोडागाडीत झाली होती.

टॅग्स :संजय दत्तसुनील दत्त