बॉलिवूडमधील टॉप अभिनेत्रींपैकी एक शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) तिच्या प्रोफेशनल लाइफसोबतच वैयक्तिक आयुष्यासाठीही चर्चेत असते. शिल्पा शेट्टी दोन्ही गोष्टी चांगल्या प्रकारे सांभाळते. अभिनेत्रीची बहीण शमिता शेट्टी(Shamita Shetty)बद्दल सांगायचे तर, तिने तिच्या करिअरमध्ये फक्त ९ चित्रपट केले आहेत, तिचे बहुतेक चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाले आहेत. शरारा गाण्यातून तिला चांगलीच लोकप्रियता मिळाली. शमिता शेट्टीच्या वयाची चाळीशी उलटूनही अद्याप ती अविवाहित आहे.
शमिता शेट्टी बिग बॉस १५ मध्ये प्रवेश केल्यावर प्रकाशझोतात आली आणि या सीझनमध्ये ती राकेश बापटच्या प्रेमात पडली. चाहत्यांनाही शमिता आणि राकेशची जोडी आवडू लागली, पण घराबाहेर पडल्यानंतर शमिताचे या अभिनेत्यासोबतचे नातेही टिकले नाही. आतापर्यंत अभिनेत्री सिंगल आहे. याआधीही शमिताचे बऱ्याच लोकांसोबत रिलेशनशीपमध्ये होती पण तिचे नाते फार काळ टिकू शकले नाही.
अद्याप का आहे सिंगल?शमिता शेट्टीचे नाव मनोज बाजपेयीसोबतही जोडले गेले आहे. रिपोर्ट्सनुसार, मनोजसोबत लग्न करू न शकल्यामुळे शमिताने आजपर्यंत कोणाशीही लग्न केलेले नाही. याशिवाय शमिता हरमन बावेजासोबतही बऱ्याच दिवसांपासून रिलेशनशिपमध्ये होती. या अभिनेत्रीचे नाव उदय चोप्रासोबतही जोडले गेले आहे. शमिता शेट्टीला अजून तिचा मिस्टर परफेक्ट सापडलेला नाही. ति तिच्या आयुष्यात योग्य व्यक्तीच्या शोधात असतो. अभिनेत्रीने म्हटले की, तिला लग्नाबाबत तिच्या घरच्यांकडून कधीही कोणत्याही दबावाला सामोरे जावे लागले नाही, तिला अजून असे कोणी सापडले नाही की ज्याच्यासोबत ती आयुष्य व्यतित करु शकेल.