'तेजाब', 'दिल तो पागल है' आणि 'बेटा' सारख्या आयकॉनिक चित्रपटांसाठी ओळखल्या जाणाऱ्या माधुरी दीक्षितने नव्वदच्या दशकात प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. तिने शाहरुख खान, सलमान खान, आमिर खान, अक्षय कुमार आणि इंडस्ट्रीमधील इतर सहकाऱ्यांसोबत स्क्रीन शेअर केली आहे. याच दरम्यान, माधुरीने स्पष्ट केले की नव्वदच्या दशकातील हे कलाकार इतका मोठा काळ कसे टिकून राहिले?
मिड डेच्या रिपोर्टनुसार, माधुरी दीक्षितचे असे मत आहे की, दीर्घकाळ टिकणारे करिअर कधीही योगायोगाने घडत नाही. ती म्हणाली, "मला वाटते की हे सातत्यामुळे शक्य झाले आहे. त्यांनी सातत्याने चांगले चित्रपट केले आणि स्वतःला कामात पूर्णपणे झोकून दिले. मी इथे फक्त पैशाबद्दल बोलत नाहीये, तर स्वतःच्या समर्पणाबद्दल बोलत आहे."
यशाच्या शिखरावर असतानाही कधी थांबले नाहीतमाधुरी दीक्षितने पुढे सांगितले की, अनेक स्टार्सनी निर्माते बनून आपल्या प्रवासाची सूत्रे स्वतःच्या हातात घेतली. त्यांनी अत्यंत निष्ठेने काम केले, कधीही हार मानली नाही आणि आपल्या यशावर कधीही ब्रेक लावला नाही. मला वाटते की याच गोष्टी खऱ्या अर्थाने दीर्घ करिअरसाठी मदत करतात.
शाहरुखबद्दल माधुरीला काय वाटते?मुलाखतीदरम्यान माधुरीने शाहरुख खानबद्दल तिला नेमके काय वाटते हे सांगितले. शाहरुखबद्दल बोलताना ती म्हणाली, "तो खूप मिळूनमिसळून वागणारा आणि देखणा आहे. तो आपल्या आजूबाजूच्या लोकांना कशा प्रकारे कम्फर्टेबल वाटेल याची काळजी घेतो. केवळ त्याच्या को-स्टार्सचीच नाही, तर त्याच्यासोबत काम करणाऱ्या प्रत्येक महिलेची तो आदरपूर्वक काळजी घेतो. तो अत्यंत हजरजबाबी आणि हुशार आहे, तो कोणत्याही विषयावर बोलू शकतो. त्याचे व्यक्तिमत्व खूप प्रभावी आहे. आमचे एकमेकांशी खूप चांगले जमते."
सलमान खानला म्हटलं 'डाउन-टू-अर्थ'सलमान खानबद्दल बोलताना माधुरी दीक्षित म्हणाली की, "कदाचित तो आपल्या कामाबद्दल खूप गंभीर वाटत नसेल, पण कॅमेरा सुरू होताच तो पूर्णपणे कामात मग्न होतो." तिने पुढे सांगितले की, इतका मोठा स्टार असूनही सलमान खऱ्या आयुष्यात अत्यंत साधा आणि जमिनीवर पाय असलेला माणूस आहे. आम्ही एकत्र खूप चांगले काम केले. मी त्याच्यासोबत चार ते पाच चित्रपट केले आहेत. तो खऱ्या आयुष्यात अत्यंत डाउन-टू-अर्थ आणि साधा माणूस आहे."
Web Summary : Madhuri Dixit attributes the enduring success of 90s stars like Shah Rukh and Salman to their dedication and constant effort. She praises SRK's caring nature and Salman's down-to-earth personality, highlighting their commitment to their craft.
Web Summary : माधुरी दीक्षित ने शाहरुख और सलमान जैसे 90 के दशक के सितारों की सफलता का श्रेय उनके समर्पण और निरंतर प्रयास को दिया। उन्होंने एसआरके की देखभाल करने वाली प्रकृति और सलमान के सरल व्यक्तित्व की सराहना की।