Join us
Daily Top 2Weekly Top 5

क्यूँ आता हैं सनी को गुस्सा? कपिलच्या शोवर सनीचे ‘सिक्रेट’ ओपन!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2016 11:58 IST

‘बॉलिवूडची लैला’ सनी लिओनी ही ‘रईस’ मधील ‘लैला मैं लैला’ या गाण्यामुळे सध्या प्रचंड चर्चेत आहे. हॉट लुक आणि ...

‘बॉलिवूडची लैला’ सनी लिओनी ही ‘रईस’ मधील ‘लैला मैं लैला’ या गाण्यामुळे सध्या प्रचंड चर्चेत आहे. हॉट लुक आणि सेक्सी अंदाजामुळे तिच्या या गाण्याला यूट्यूबवर लाईक्स मिळत असून  या आयटम साँगमुळे चित्रपटाला एक ग्लॅमर मिळाले आहे. पण, तुम्ही कधी विचार केलाय का, अशा गुड लुकिंग सनीला कधी राग येऊ शकतो का? तर होय. केवळ एकाच गोष्टीमुळे सनीला खुप राग येतो म्हणे. तिचा पती डॅनिअललाही तिच्या रागाचा अनेकदा सामना करावा लागलाय. मग, सनीला राग येतोच का? जाणून घ्यायचेय तर वाचा..                                                                नुकतीच सनी पती डॅनिअल वीबर सोबत ख्रिसमस सेलिब्रेट करण्यासाठी कपिल शर्माच्या शोवर आली होती. तेव्हा गप्पांच्या ओघात तिचे एक सिक्रेट उघड झाले. ते म्हणजे तिला भूक बिल्कूल सहन होत नाही. जेव्हा तिला भूक लागलेली असते तेव्हा ती तिच्या पतीवरही रागराग करत असते. त्यामुळे पती डॅनिअल नेहमी स्वत:सोबत अनेक खाद्यपदार्थ बाळगतच असतो. ती प्रथमच पतीसोबत कपिलच्या शोवर आली होती. तिने डॅनिअलचेही अनेक सिक्रेट यावेळी उघड केले. तिने हे देखील सांगितले की, त्यांचे लग्न हे भारतीय पद्धतीने संपन्न झााले. तिने अनेकदा ‘करवाचौथ’चे व्रत देखील केलेले नाही, कारण तिला भूकच सहन होत नाही. तिला दर दोन घंट्याला काही ना काहीतरी खायला लागतेच. अशावेळी जर तिच्यासमोर एखादा खाद्यपदार्थ आला नाही तर ती तिच्या पतीवर देखील राग राग करते.                                                               पूर्वाश्रमीची पॉर्नस्टार सनी लिओनी आता बॉलिवूडच्या सर्वांत हॉट अभिनेत्रींपैकी एक मानली जाते. सध्या ती ‘रईस’ मधील ‘लैला मैं लैला’ या गाण्यामुळे घराघरात पोहोचली आहे. ‘रईस’ २५ जानेवारीला रिलीज होणार असून चित्रपट हिट होईल किंवा नाही पण, तिचे आयटम साँग मात्र हिट आत्ताच  झाले आहे.