Join us
Daily Top 2Weekly Top 5

काजोल सतत अ‍ॅक्टिंगमधून का घेते ब्रेक?, याबाबत स्वतःच अभिनेत्रीने केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2024 18:23 IST

Actress Kajol : अभिनेत्री काजोल लवकरच 'दो पत्ती' सिनेमात दिसणार आहे. या चित्रपटामुळे ती चर्चेत आहे.

अभिनेत्री काजोल (Kajol) बॉलिवूडची बिनधास्त अभिनेत्री आहे. तिने आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर रसिकांच्या मनावर आपली छाप उमटवली आहे. आता ती लवकरच दो पत्ती सिनेमात दिसणार आहे. या चित्रपटामुळे ती चर्चेत आहे. दरम्यान या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान तिने कामातून सतत ब्रेक का घेते, याचा खुलासा केला आहे.

इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत काजोलने चित्रपटातून सतत ब्रेक का घेते, याबद्दल सांगितले. तिने स्वतःला सर्वात कमी काम करणारी अभिनेत्री असे संबोधले आहे. ती म्हणाली की, जर तुम्ही माझी फिल्मोग्राफी पाहिली तर मी सर्वात कमी काम करणारी अभिनेत्री आहे. माझी आई (अभिनेत्री तनुजा) आणि आजी (दिवंगत दिग्दर्शिका आणि अभिनेत्री शोभना समर्थ) नेहमीच मला म्हणायच्या की, काम तुमच्या जीवनाचा एक भाग आहे ना की संपूर्ण जीवन.

कामातून मिळणाऱ्या ब्रेकबद्दल काजोल म्हणाली...

काजोल पुढे म्हणाली की, मी ब्रेक घेतला. मला लग्न करायचे होते आणि मुले हवी होती. मी आताही काम करते आहे आणि अजूनही त्याच्याशी संबंधीत आहे. काजोलने नमूद केले की तिच्या कामामुळेच तिला ब्रेक घेता आला, तिच्या चित्रपटाची पार्श्वभूमीने नाही. अभिनेत्री म्हणाली, हे वारशाबद्दल नाही. हे प्रत्येक स्त्रीचे काम आहे. नर्गिस, शर्मिला टागोर यांना कोणताही वारसा नव्हता. आज मी जो काही आहे तो माझ्या वंशामुळे नाही. काम करणाऱ्या प्रत्येक स्त्रीचा हा वारसा आहे. प्रत्येक स्त्रीला निर्णय घ्यावा लागेल की आता मी विश्रांती घेईन आणि जर मला परत यायचे असेल तर मी परत येईन आणि तिला हवे असेल तर ती तसे करू शकेल.

वर्कफ्रंट

काजोलच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, अभिनेत्री लवकरच दो पत्तीमध्ये दिसणार आहे. या चित्रपटातून क्रिती निर्माती म्हणून डेब्यू करत आहे. या चित्रपटात काजोल पहिल्यांदाच पोलिसाची भूमिका साकारताना दिसणार आहे. काजोल आणि क्रिती सनॉनचा आगामी थ्रिलर दो पत्ती २५ ऑक्टोबरला नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे. याशिवाय ही अभिनेत्री इतरही अनेक प्रोजेक्टमध्ये दिसणार आहे.  

टॅग्स :काजोल