उडता पंजाबसोबत दुजाभाव का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2016 18:27 IST
उडता पंजाब या चित्रपटातील पंजाब हा शब्द वगळण्यात यावा आणि या चित्रपटातील ८९ दृश्ये वगळण्यात यावीत असे सेन्सॉर बोर्डाने ...
उडता पंजाबसोबत दुजाभाव का?
उडता पंजाब या चित्रपटातील पंजाब हा शब्द वगळण्यात यावा आणि या चित्रपटातील ८९ दृश्ये वगळण्यात यावीत असे सेन्सॉर बोर्डाने म्हटले आहे. या चित्रपटावरून वाद सुरू असतानाच ड्रग्स या विषयावर आधारित असलेल्या धी पंजाब दी या पंजाबी चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाकडून यू प्रमाणपत्र देण्यात आले आहे. या चित्रपटाचे लेखक-दिग्दर्शक-निर्माते बलजीत सिंग यांच्यामते धी पंजाब दी हा चित्रपट ड्रग्सवर आधारित असला तरी या चित्रपटातून कोणत्याही प्रकारे पंजाब या राज्याचा अपमान करण्यात आलेला नाही. सेन्सॉर बोर्डाच्या प्रतिनिधींनी ज्यावेळी हा चित्रपट पाहिला, त्यावेळी त्यांनी या चित्रपटातील केवळ एक दृश्य वगळण्यास सांगितले. पण ड्रग्स हा विषय केवळ पंजाबपुरता मर्यादित नसून ड्रग्स ही हरयाणा, राजस्थान, महाराष्ट्र या राज्यांचीही समस्या बनली आहे. त्यामुळे या चित्रपटाला यू हे प्रमाणपत्र दिले पाहिजे असे सेन्सॉर बोर्डातील प्रतिनिधिंचे म्हणणे होते. पण उडता पंजाब या चित्रपटातील भाषा ही अतिशय असभ्य असल्याने या चित्रपटाला विरोध झालाच पाहिजे असे बलजीत यांचे म्हणणे आहे.