सेटवर जाण्यास अक्षयला का आवडत नाही?
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2016 17:45 IST
जेव्हा आपण लागोपाठ अॅक्शन फिल्म्स करतो, त्यावेळी सेटवर जाणे आपल्याला आवडत नसल्याचे अक्षय कुमार म्हणतो. अशावेळी ब्रेक घेणे हे ...
सेटवर जाण्यास अक्षयला का आवडत नाही?
जेव्हा आपण लागोपाठ अॅक्शन फिल्म्स करतो, त्यावेळी सेटवर जाणे आपल्याला आवडत नसल्याचे अक्षय कुमार म्हणतो. अशावेळी ब्रेक घेणे हे मी महत्वाचे मानतो, असेही त्याने सांगितले.कोणत्या गोष्टी आवडतात आणि कोणत्या नाही या प्रश्नावर बोलताना अक्षय म्हणाला, ‘कॉमेडी करणे हे नेहमीच अवघड काम असते. परंतु मला ते आवडते.’ अक्षयचा हाऊसफुल ३ हा चित्रपट या शुक्रवारी प्रदर्शित झाला.४८ वर्षीय अक्षय कुमार नव्वदीच्या दशकात अॅक्शन स्टार म्हणून समोर आला होता. मोहरा, मै खिलाडी तु अनाडी, सबसे बडा खिलाडी हे त्याचे चित्रपट गाजले होते. अक्षयने चांगले कथानक असणारे स्पेशल २६, हॉलीडे, बेबी, एअरलिफ्ट हे चित्रपट केले. सिंग इज ब्लिंगसारखा विनोदी चित्रपट केला. हाऊसफुल ३ नंतर तो आता रुस्तुममध्ये दिसेल.