परिणीती चोप्राच्या आवाजाने का झाले सचिन-जिगर घायाळ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2017 17:36 IST
बऱ्याच काळापासून परिणीती चोप्रा मोठ्या पडद्यापासून दूर आहे. ‘ढिश्शूम’मधील एक गाणे वगळता तिची फार अशी विशेष चर्चा झाली नाही. ...
परिणीती चोप्राच्या आवाजाने का झाले सचिन-जिगर घायाळ?
बऱ्याच काळापासून परिणीती चोप्रा मोठ्या पडद्यापासून दूर आहे. ‘ढिश्शूम’मधील एक गाणे वगळता तिची फार अशी विशेष चर्चा झाली नाही. म्हणून तिचे सर्व चाहते आता तिच्या आगमी चित्रपटाची आतूरतेने वाट पाहत आहेत.मे महिन्यात येणाऱ्या ‘मेरी प्यारी बिंदू’ या चित्रपटाकडून तिला फार अपेक्षा आहेत. चित्रपटाला यशस्वी करण्यासाठी परिणीती वाटेल ती मेहनत घेत आहे. सिनेमात एका गायिकेच्या भूमिकेत दिसणार आहे. रोलच्या तयारीसाठी तिने गायनाचे रितसर प्रशिक्षण घेतले, प्रॅक्टिस केली आणि गाणे गायिले.संगीतकार जोडी सचिन-जिगर तिच्या मेहनतीने फारच प्रभावित झाले आहे. एकाच प्रयत्नात तिने गाणे रेकॉर्ड केले. नुकतेच ते म्हणाले की, ‘परिणीतीने ज्या तन्मयतेने गाणे गायिले आहे ते ऐकून आम्ही तरच्या गायिकीचे फॅन झालो आहोत. प्रोफशनल सिंगरलाही टक्कर देऊ शकेल एवढा चांगला तिचा आवाज आहे. तिने जर अशीच प्रॅक्टिस सुरू ठेवली तर ती नक्कीच प्रोफशनल गायिका म्हणून पुढे येऊ शकते.’►ALSO READ: मेरी प्यारी बिंदूची शूटींग समाप्ततिच्यासोबत या सिनेमात आयुषमान खुराणादेखील आहे. चित्रपटाच्या घोषणेवेळी परिणीतीने तिच्या आवाजाची एक झलक ऐकवली होती. मात्र आता तिच्या आवाजातील संपूर्ण गाणे ऐकण्यासाठी आम्हीदेखील उत्सुक आहोत. पुढील महिन्यात हे गाणे लाँच होणार आहे.म्हणजे आता प्रियांका चोप्रा, श्रद्धा कपूर, आलिया भट्टनंतर परिणीतीसुद्धा सिंगिंगमध्ये नशिब आजमावणार असे दिसतेय. प्रियांका चोप्राने आंतरराष्ट्रीय स्तरावरील अल्बम निर्माण केलेला असून ‘दिल धडकने दो’ आणि ‘व्हेंटिलेटर’ या दोन चित्रपटांसाठी गाणे गायलेले आहे. श्रद्धा कपूरने ‘एक व्हिलेन’ आणि ‘रॉक आॅन २’मध्ये तिच्या आवाजाची जादू दाखवली आहे. आलियाने ‘हायवे’मध्ये थेट ए. आर. रहमान यांच्यासाठी गाणे गायले होते.► READ ALSO: परिणीती चोप्राने केली सलग २५ तास शूटींग