Join us

सुशांतने का केले ट्विटर अकाऊंट बंद?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2016 11:06 IST

अभिनेता सुशांत सिंग रजपूत सध्या त्याच्या व्यवसायिक आयुष्यापेक्षा वैयक्तिक आयुष्यामुळे जास्त चर्चेत आहे. सुशांतने आणि अभिनेत्री अंकिता लोखंडे यांनी ...

अभिनेता सुशांत सिंग रजपूत सध्या त्याच्या व्यवसायिक आयुष्यापेक्षा वैयक्तिक आयुष्यामुळे जास्त चर्चेत आहे. सुशांतने आणि अभिनेत्री अंकिता लोखंडे यांनी अनेक वर्षांच्या नात्याला नुकताच पूर्णविराम दिला. त्यांचे ब्रेकअप का झाले हे जाणून घेण्याची सगळ्यांना उत्सुकता आहे. सुशांतच्या ट्वीटवरून काही समजतेय का यासाठी त्याच्या ट्वीटरवरही अनेकजण लक्ष ठेवून असतात. या सगळ्या गोष्टींचा आता सुशांतला कंटाळा आला आहे. आपल्या वैयक्तिक आयुष्यात कोणीही डोकावू नये यासाठी त्याने आपले ट्विटर अकाउंटच बंद केले आहे. सुशांत ट्विटरवरून गायब झाल्याने त्याचे फॅन्स तर त्याला नक्कीच मिस करणार आहेत.