Join us

का वाढला सोनमचा अमेरिकेतील मुक्काम?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2016 13:47 IST

सोनम कपूर सध्या अमेरिकेत आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीदरम्यान सोनमने हिलरी क्लिंटन यांना पाठींबा दिला होता. हिलरी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष व्हाव्यात,अशी ...

सोनम कपूर सध्या अमेरिकेत आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीदरम्यान सोनमने हिलरी क्लिंटन यांना पाठींबा दिला होता. हिलरी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष व्हाव्यात,अशी तिची इच्छा होती. पण सोनमची इच्छा पूर्ण होऊ शकली नाहीच. डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आले. यानंतर सोनम मायदेशी परतली असेल, असेच तुम्हाला वाटेल. पण नाही, सध्या तरी सोनम अमेरिकेतून परतलेली नाही. उलट अमेरिकेतील तिचा मुक्काम तिने आणखी वाढवला आहे. आता का? तर हॉलिवूड चित्रपट मिळवण्यासाठी. होय, दीपिका आणि प्रियांका यांच्याप्रमाणे सोनमही हॉलिवूडमध्ये काम करू इच्छिते. यासाठी दीपिका व प्रियांकाप्रमाणेच तिनेही एका इंटरनॅशनल एजन्सीची मदतही घेतली आहे. याच एजन्सीने दिलेल्या सल्लयानुसार, सोनम आणखी काही दिवस अमेरिकेत राहून कामाचा शोध घेणार आहे. हॉलिवूडचे काही बडे फिल्ममेकर्स आणि स्टुडिओंना भेटण्याची तिची योजना आहे. या वर्षांच्या सुरुवातीलाही सोनम अनेक दिवस अमेरिकेत होती. तिला हॉलिवूड प्रोजेक्ट मिळाल्याची चर्चाही तेव्हा रंगली होती. पण सोनमच्या निकटस्थ सूत्रांनी ही चर्चा नाकारली होती. असे काहीही नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. पण आता पुन्हा सोनम अमेरिकेत तळ ठोकून बसलीय, म्हटल्यावर तिच्या हाती काहीतरी ठोस लागलेले असावे,असेच दिसतेयं. आता खरे काय ते तर सोनमलाच ठाऊक़ पण खरोखरीच सोनमच्या हाती हॉलिवूड प्रोजेक्ट लागला असेल तर प्रियांका आणि दीपिकाला आणखी एक प्रतिस्पर्धी मिळणार. होय ना?