का झाले सलमानला अश्रू अनावर?
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2016 14:30 IST
राजश्री प्रोडक्शनचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी रजत बडजात्या यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या शोकसभेला सलमान खानला त्याचे ...
का झाले सलमानला अश्रू अनावर?
राजश्री प्रोडक्शनचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी रजत बडजात्या यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या शोकसभेला सलमान खानला त्याचे अश्रू अनावर झाले. सलमान आणि बडजात्या कुटुंबाचे नाते हे गेल्या अनेक वर्षांपासूनचे आहे. सलमानला मैंने प्यार किया हा त्याचा पहिला हिट चित्रपट हा त्यांच्याच बॅनरमुळे मिळाला. मैंने प्यार किया या चित्रपटापासूनच सलमान आणि रजतची मैत्री आहे. रजत हा सलमानपेक्षा वयाने लहान होता. त्यामुळे सलमान त्याला आपल्या लहान भावाप्रमाणेच वागवत असे. हम आपके है कौन या चित्रपटाच्यावेळात तर रजत नुकताच कॉलेज पास आऊट झाला होता. त्यावेळी त्याला चिडवणे, मस्ती करणे या गोष्टी तर सलमान नेहमीच करत असे. सलमानचे हे रजतसोबतचे नाते पाहाता सलमानाने एक भाऊ गमावला आहे असेच त्याला वाटत आहे.