Join us

सैफ अली खान आणि अमृता सिंग का झाले वेगळे?, ही व्यक्ती होती कारणीभूत; नाव वाचून बसेल धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2022 18:54 IST

Saif Ali Khan And Amrita Singh : सैफ अली खान आणि अमृता सिंगच्या नात्यात लग्नानंतर काही वर्षांनी दुरावा आला. त्यानंतर दोघांनीही एकमेकांपासून घटस्फोट घेऊन त्यांचे नाते संपवले.

बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये अशी काही जोडपी आहेत, ज्यांचे प्रेमप्रकरण फुललं आणि लग्नाच्या बंधनातही अडकले. अशीच एक जोडी आहे सैफ अली खान (Saif Ali Khan) आणि अमृता सिंग (Amrita Singh) यांची. ऐंशीच्या दशकातील या यशस्वी अभिनेत्रीवर सैफचे प्रेम जडले. दोघेही तीन महिने एकमेकांना डेट करत होते. त्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यांचा विवाह मोठ्या थाटामाटात पार पडला. लग्नानंतर काही वर्षांनी दोघांच्या नात्यात दुरावा आला. त्यानंतर त्यांचे नाते तुटले आणि दोघांनीही एकमेकांपासून घटस्फोट घेऊन त्यांचे नाते संपवले.

सैफ अली खानचे विवाहबाह्य संबंध आणि पैसा हे दोघांच्या ब्रेकअपचे कारण असल्याचे बोलले जात आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, लग्नाच्या काही वर्षानंतर सैफ स्विस मॉडेल रोजा कॅटालानोच्या जवळ आला होता. त्यामुळे त्याच्या आणि अमृतामध्ये अंतर वाढू लागले आणि नात्यात दुरावा येऊ लागला. हे प्रकरण इतके वाढले होते की २००४ मध्ये दोघांनी घटस्फोट घेतला आणि त्यांचे नाते कायमचे संपुष्टात आले. मात्र, काही वर्षे रोजा कॅटालानोला डेट केल्यानंतर सैफ अली खानही तिच्यापासून वेगळा झाला.

यानंतर सैफ अली खानने टशन चित्रपटाच्या सेटवर करीना कपूरची भेट घेतली. दोघांमध्ये मैत्री झाली आणि त्यानंतर दोघेही एकमेकांना डेट करू लागले. जवळपास पाच वर्षे डेटिंग केल्यानंतर दोघांनी २०१२ मध्ये लग्न केले. सैफला अमृतापासून दोन आणि करीना कपूर खानपासून दोन अशी चार मुले आहेत.

टॅग्स :अमृता सिंगसैफ अली खान