Join us
Daily Top 2Weekly Top 5

 फक्त एक उत्तर आणि बदल्यात शरद केळकरला मागेल ते द्यायला तयार होते लोक, वाचा इंटरेस्टिंग खुलासा   

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2020 17:06 IST

प्रश्न विचारून लोकांनी शरदला भांडावून सोडले होते...

ठळक मुद्देएसएस राजमौली यांच्या ‘बाहुबली’च्या पहिल्या पार्टवर 180 कोटी रूपये खर्च झाले होते आणि या सिनेमाने वर्ल्डवाईड 685.5 कोटींची कमाई केली होती.

अभिनेता प्रभासचा सुपरडुपर हिट सिनेमा ‘बाहुबली’ची क्रेज अद्यापही कमी झालेली नाही.  ‘बाहुबली’चा पहिला भाग आला तेव्हा एका प्रश्नाने चाहते अक्षरश: वेडे झाले होते. इतके की सोशल मीडियावर केवळ ‘कटप्पाने बाहुबली को क्यों मारा?’ हाच एक प्रश्न होता. या सिनेमात कटप्पाची भूमिका साऊथचा दिग्गज अभिनेता सत्यराजने साकारली होती तर बाहुबलीच्या भूमिकेत प्रभास झळकला होता. हिंदीत हा सिनेमा डब झाला, तेव्हा प्रभासच्या पात्राला मराठमोळा अभिनेता शरद केळकरने आवाज दिला होता. शरदसाठी  ‘बाहुबली’ एक मोठा प्रोजेक्ट होता. अशात ‘कटप्पाने बाहुबली को क्यों मारा?’ या प्रश्नाचे उत्तर शरद केळकरलाही ठाऊक होते. साहजिकच या प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्यासाठी अनेक लोक शरदच्या मागे पडले होते. या उत्तराच्या बदल्यात महागडी गिफ्ट देण्याची तयारीही अनेकांनी दर्शवली होती.

एका ताज्या मुलाखतीत शरदने स्वत: याचा खुलासा केला. त्याने सांगितले की, ‘बाहुबली’ रिलीज झाला आणि बाहुबलीने कटप्पा को क्यों मारा? या एका प्रश्नावर येऊन संपला. त्यानंतर अनेक लोकांनी या प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्यासाठी अक्षरश: मला भांडावून सोडले होते. मला परफ्युम, डिनर अशी काय काय आमीषे देण्यात आली होती. काहीही घे आणि या प्रश्नाचे उत्तर सांग, अशा विनवण्या अनेकांनी मला केल्या होत्या. माझी पत्नीही या प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्यास उत्सूक होती. पण मी तिलाही सांगितले नव्हते. मात्र ती इतकी अस्वस्थ झाली होती की, चित्रपट रिलीज होण्याच्या एका आठवड्याआधी मी तिला या प्रश्नाचे उत्तर दिले होते. अर्थात कुणालाही सांगायचे नाही या अटीवर...

एसएस राजमौली यांच्या ‘बाहुबली’च्या पहिल्या पार्टवर 180 कोटी रूपये खर्च झाले होते आणि या सिनेमाने वर्ल्डवाईड 685.5 कोटींची कमाई केली होती. तर बाहुबली 2 वर 250 कोटी खर्च झाले होते आणि या सिनेमाने 1810 कोटींची कमाई केली होती. हा एक विक्रम होता.

टॅग्स :शरद केळकरबाहुबली