Join us

​बॉलिवूड नट्या रिलेशनशिपबद्दल बोलणे का टाळतात?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2016 16:53 IST

बॉलिवूड अ‍ॅक्ट्रेस स्वत:च्या रिलेशनशिपबाबत उघडपणे बोलणे टाळतात. ते लपवण्याचा आटापिटा करताना दिसतात. यामागचे कारण काय? अभिनेत्री आलिया भट्ट हिने ...

बॉलिवूड अ‍ॅक्ट्रेस स्वत:च्या रिलेशनशिपबाबत उघडपणे बोलणे टाळतात. ते लपवण्याचा आटापिटा करताना दिसतात. यामागचे कारण काय? अभिनेत्री आलिया भट्ट हिने यामागचे कारण सांगितले आहे. आलिया स्वत: अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा याच्यासोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचे बोलले जाते. खुद्द आलियाने मात्र हे कधीच कबुल केलेले नाही. आलियाच्या मते, बॉलिवूड अ‍ॅक्ट्रेस स्वत:च्या खासगी आयुष्याबाबत बोलणे टाळतात कारण समाज. आपण मोरल पोलिसिंगची शिकार ठरू,अशी भीती त्यांना वाटत असते. भारतात तुम्ही ज्या समाजाचा भाग आहात. तो समाज खूप जास्त जजमेंटल आहे. ज्या मुलींचे एकापेक्षा अधिक ब्रॉयफे्रन्ड असतात, त्यांच्याकडे समाज अजूनही वेगळ्या नजरेने पाहतो. टेलर स्विफ्टचेच बघा. ती अनेकांसोबत डेटवर गेली. पण तीच जर भारतात असती तर तिची इमेज काहीशी वेगळी असती. एकंदर समाजात आपली प्रतिमा खराब होऊ नये, यासाठीच सगळा आटापीटा केला जातो.आलियाच्या म्हणण्यात तथ्य आहे, हे तर मान्य करावेच लागेल.. तुम्हाला काय वाटते??