Join us
Daily Top 2Weekly Top 5

आराध्याला ऐश अजूनही कडेवर का घेते?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2016 11:37 IST

विश्वसुंदरी ऐश्वर्या रॉय बच्चन आणि अभिषेक बच्चन यांची मुलगी आराध्या आता ४ वर्षांची झाली. कोणताही इव्हेंट असो किंवा कुठली ...

विश्वसुंदरी ऐश्वर्या रॉय बच्चन आणि अभिषेक बच्चन यांची मुलगी आराध्या आता ४ वर्षांची झाली. कोणताही इव्हेंट असो किंवा कुठली पार्टी...ऐश आराध्याला आपल्यासोबत घेऊन येतेच. आणि तेही केवळ सोबत नाही तर स्वत:च्या कडेवर घेऊन येते.आता सर्वांना प्रश्न पडला की, ऐश आराध्याला कडेवर घेऊनच का येते? तेव्हा तिने याचे उत्तर दिले की,‘ आपण जेव्हा चालत असतो तेव्हा ती फार चांगल्या मुडमध्ये असते. पण जेव्हा लोक फोटो काढू लागतात, बोलू लागतात तेव्हा तिला थोडे विचित्र वाटते.आणि मग एकदम गर्दी जर झाली तर तिला कधीकधी मलाही पाहता येत नाही. म्हणून मग मी ती घाबरू नये म्हणून तिला माझ्या कडेवरच ठेवते. मला चाहत्यांनाही नाराज करावयाचे नसते आणि आराध्यालाही.’