Join us

अमृताला का आलाय राग?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2016 20:13 IST

करिना कपूर -खानच्या बर्थडे पार्टीनंतर सैफ अली खानची पहिली पत्नी व अभिनेत्री अमृता सिंग चांगलीच चर्चेत आली आहे. अमृता ...

करिना कपूर -खानच्या बर्थडे पार्टीनंतर सैफ अली खानची पहिली पत्नी व अभिनेत्री अमृता सिंग चांगलीच चर्चेत आली आहे. अमृता व सैफची मुलगी सारा अली खानने तिच्या सावत्र आईचे (करिना) अनुकरण करू नये असे तिचे मत आहे. तर करण जोहरच्या ‘स्टुडंट आॅफ द ईअर’च्या सिक्वलसाठी साराने दिलेल्या नकाराचे कारणही अमृता असल्याचे सांगण्यात येते आहे. याच गॉसिपमुळे तिचा माथा चांगलाच तापलाय ती म्हणते, ‘‘आजकल मेरे नाम के बहुत बिल फाडे जा रहे है’’ (आजकाल मला सर्व गोष्टींसाठी जबाबदार ठरविले जात आहे.)​एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये अमृताने आपला राग व्यक्त केला आहे.  अमृता म्हणाली, ‘‘आजकाल माझ्या नावाचा दुरुपयोग केला जातोय. मी तुम्हाला सांगते, आजकालच्या मुलांना त्यांची स्वत:ची बुद्धी आहे. त्याचा वापर कसा करावा हे त्यांना चांगलेच ठाऊक आहे. मी माझी मुलगी सारा व मुलगा इब्राहिमला त्यांना जे काही करायचे आहे, त्याची मोकळीक दिली आहे. त्यांनी माझे एैकलेच पाहिजे असे नाही. साराने शिक्षणानंतर अ‍ॅक्टिंगमध्ये करिअर निवडले. कोलंबिया विद्यापीठातून पदवी मिळविल्यावर तिने आपले लक्ष बॉलिवूडमध्ये केद्रित केले. ती कॉलेजमध्ये जाणार नाही असे तिने ठरविले, यात मी काहीच करूच नाही. ‘‘माझ्या मुलीला ‘स्टुडेंट आॅफ द ईअर 2’ची आॅफरच नव्हती, तर ‘द फॉल्ट इन स्टार्स’ थंडबस्त्यात पडला यासाठी सारा जबाबदार कशी?. सारा 4 वर्षांची होती तेव्हापासून ती अभिनेत्री होणार असे तिने ठरविले होते. तीने अद्याप एकही चित्रपट साईन केला नाही, ती चांगल्या चित्रपटाच्या प्रतिक्षेत आहे’ असेही अमृता सिंग म्हणाली. करण जोहर स्टुडंट आॅफ द ईअरच्या सिक्वलमधून सारा बॉलिवूडमध्ये पदार्पन करणार असल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. यात सारा टायगर श्रॉफच्या अपोझिट काम करणार होती. यासोबतच ती शाहीद कपूरचा भाऊ इशानसोबत ‘द फॉल्ट इन स्टार्स’च्या रिमेकमध्ये काम करणार असल्याचेही सांगण्यात आले होते. मात्र साराने हे दोन्ही प्रोजेक्ट सोडल्याच्या बातम्या आल्या होत्या त्यावर तिची आई अमृता सिंगने दिलेले उत्तर बरेच काही सांगून जाते हे विशेष.