Join us
Daily Top 2Weekly Top 5

'नेहमी मुलींनाच केले जाते टार्गेट', सुष्मिता सेनच्या वहिनीची 'ती' पोस्ट व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2022 15:28 IST

गेल्या काही दिवसांपासून राजीव सेन आणि चारु असोपा यांच्या नात्यावरही चर्चा रंगल्या. राजीव सेन आणि चारु यांच्या वैवाहिक आयुष्यात मोठं वादळ आलं. दोघेही घटस्फोट घेणार असल्याचे समोर आले होते.

दोन दिवसांपूर्वी सुष्मिता सेन आणि ललित मोदी यांच्या अफेअरची  बातमी आली आणि सर्वत्रच सुरु झाल्या खुमासदार चर्चा....अफेअरच्या बातमीवर सगळ्यांनीच सुष्मिता सेनला चांगलेच ट्रोल केल्याचे पाहायला मिळाले. अनेकांनी सुष्मिताला ‘गोल्ड डिगर’ (संधीसाधू) म्हणत, ती पैशांसाठी ललित मोदींच्या प्रेमात पडल्याचा आरोप केला.मात्र आता खुद्द सुष्मिता सेननं तिचं मौन सोडलंय.या बातम्यांवर सुष चांगलीच संतापलीय.सोशल नेटवर्किंग साईटवर ट्रोल  करणार्‍यांना सुषनं चांगलंच सुनावलंय. भलीमोठी पोस्ट शेअर करत तिने ट्रोलर्सना सडेतोड उत्तर दिलं आहे.सुष्मितानंतर आता तिची वहिनी अभिनेत्री चारु असोपानंही अफेअरच्या रंगलेल्या चर्चांवर सुष्मिताची बाजु घेत यावर प्रतिक्रिया दिली आहे. नेहमीच मुलींना टार्गेट केले जात असल्याचे म्हणत तिने ‘द प्रॉब्लमेटिक कल्चर ऑफ कॉलिंग वुमन गोल्ड डिगर्स’ नावाचं एक आर्टिकल शेअर केले आहे'. लोकं एखाद्या मुलीला ‘गोल्ड डिगर’ म्हणण्याआधी जरासुद्धा विचार करत नाही हे फारच दुःखद असल्याचे चारुने म्हटलं आहे.

याआधी सुष्मिताचा भाऊ राजीव सेननेही यावर प्रतिक्रिया दिली होती. त्याने इंडिया टुडेला सांगितले होते की, हे ऐकून मला धक्का बसला आहे, अजूनतरी सुष्मितासोबत यावर चर्चा केली नसल्याचे त्याने म्हटले होते, पण त्याची बहीण रिलेशनशिपमध्ये आनंदी असल्याचे पाहून तो खूश असल्याचे त्याने म्हटले होते.

गेल्या काही दिवसांपासून राजीव सेन आणि चारु असोपा यांच्या नात्यावरही चर्चा रंगल्या. राजीव सेन आणि चारु यांच्या वैवाहिक आयुष्यात मोठं वादळ आलं. दोघेही घटस्फोट घेणार असल्याचे समोर आले होते.दोघांनीही त्यांच्या नात्यांंवर सोशल मीडियावर प्रतिक्रिया दिल्या होत्या. दोघांचे नाते चांगलेच बिनसल्याचे पाहायला मिळाले. दोघांनीही एकमेकांवर आरोप करत घटस्फोट घेणार असल्याचे स्पष्ट केले होते.दोघांनाही एक मुलगी आहे. चारु सिंगल मदर बनत मुलीचा सांभाळ करत आहे. राजीवपासून चारु वेगळी झाली असली तरी सुष्मितासोबतचे तिचे मैत्रीचे नाते आहे. त्यामुळेच सुष्मिताला सपोर्ट करण्यासाठी आता तिनेही मौन सोडल्याचे पाहायला मिळतंय.

टॅग्स :सुश्मिता सेनललित मोदी