Join us
Daily Top 2Weekly Top 5

जॅकलिन कोणाच्या प्रेमात?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2016 09:11 IST

मथळा वाचून प्रश्न पडला ना! तुम्हाला वाटत असेल की, आता या ‘किक’ अभिनेत्रीचे कोणाशी सुत जुळले? परंतु तसे काहीही ...

मथळा वाचून प्रश्न पडला ना! तुम्हाला वाटत असेल की, आता या ‘किक’ अभिनेत्रीचे कोणाशी सुत जुळले? परंतु तसे काहीही झालेली नाही.जॅकलिन कोण्या व्यक्तीच्य प्रेमात नाही तर ती आपल्या देशाच्या प्रेमात आकांत बुडालेली आहे. या श्रीलंकन ब्युटीला भारताविषयी, येथील परंपरा आणि संस्कृतीचे तिला विलक्षण आकर्षण आहे. तिचे फेव्हरेट हॉलिडे डेस्टिनेशन युरोप किंवा अमेरिका नसून भारत आहे.ती म्हणते, विदेशापेक्षा मला भारतात फिरायला, येथील नवनवीन शहरे एक्सप्लोर करण्यास आवडते. पहिल्या भेटीपासूनच येथील सौंदर्यांने मला मोहून टाकलेले आहे. अतिशय रोमॅण्टिक देश आहे हा.कामच्या व्यस्ततेमुळे तिला फारसा मोकळा वेळ मिळत नाही. मात्र, जेव्हा मिळतो तेव्हा सुट्या एन्जॉय करण्यासाठी ती स्विट्झर्लंडला नाही तर लोकल जयपूर, म्हैसुर, उटी, दमन-दीवला जाते. स्थानिक परंपरा आणि लोकांचे जीवनमान समजून घेण्यात तिला अधिक रस आहे.लवकरच ती ‘हाऊसफुल 3’मध्ये दिसणार आहे. त्यानंतर वरूण धवन आणि जॉन अब्राहमबरोबर ‘ढिश्शूम’ आणि टायगर श्रॉफसोबत ‘फ्लार्इंग जाट’मध्ये काम करणार आहे.