Join us
Daily Top 2Weekly Top 5

जेनेसोबत प्रिती विवाहबद्ध !

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2016 05:09 IST

प्रिती झिंटा आणि जेने गुडनग हे लॉस एँजलिस येथे एका खासगी सोहळयात विवाहबद्ध झाले आहेत. काही दिवसांपासून ते दोघे ...

प्रिती झिंटा आणि जेने गुडनग हे लॉस एँजलिस येथे एका खासगी सोहळयात विवाहबद्ध झाले आहेत. काही दिवसांपासून ते दोघे लग्न करणार असल्याच्या बातम्या येऊन धडकत होत्या. ती म्हणत होती की,‘ मी जेव्हा लग्न करायचे ठरवेल तेव्हा स्वत: अगोदर सांगेल. तसे तिने तिच्या लग्नाचे सर्व कार्यक्रम सांगितले होते.मात्र, नुकत्याच आलेल्या माहितीनुसार, त्या दोघांनी लॉस एंजलिस येथे लग्नाच्या बंधनात अडकले आहेत. यावेळी बेस्ट फ्रेंड सुझान खान आणि सुरिली गोएल हे उपस्थित होते. एप्रिलमध्ये ते भारतीय पद्धतीनुसार लग्न करणार आहेत. वेल, प्रिती आणि जेने दोघांचेही अभिनंदन!