Join us

'दबंग गर्ल' कोणाबरोबर आहे रिलेशिपशिपमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2016 11:09 IST

बॉलीवुडची दबंग गर्ल सोनाक्षी सिन्हा येत्या काही दिवसांत नवनवीन सिनेमात काम करतेय. सध्या बॉलीवुडची रज्जो फोर्स-2 सिनेमाच्या शूटिंगमध्ये बिझी ...

बॉलीवुडची दबंग गर्ल सोनाक्षी सिन्हा येत्या काही दिवसांत नवनवीन सिनेमात काम करतेय. सध्या बॉलीवुडची रज्जो फोर्स-2 सिनेमाच्या शूटिंगमध्ये बिझी आहे. नुकतंच तिनं आपला वाढदिवस साजरा केला. याच वाढदिवसाच्या पार्टीत रज्जोचं एक गुपित उघड झालंय.. या पार्टीला सोनाक्षीनं आपल्या सगळ्या जवळच्या मित्रांना आमंत्रित केलं होतं. मात्र या पार्टीत सा-याचं लक्ष वेधून घेतलं ते बंटी सजदेहनं.. बंटी सजदेह हा सोनाक्षीचा एक्स बॉयफ्रेंड आहे. या पार्टीनंतर सोनाक्षी आणि बंटीचं पुन्हा एकदा सूत जुळू लागलंय. सोनाक्षीच्या जीवनात बंटीनं रिएंट्री मारल्याचं बोललं जातंय..