Join us
Daily Top 2Weekly Top 5

​ नाराज आहे ‘पद्मावती’ची अख्खी टीम...रणवीर सिंग सुद्धा रागात! वाचा काय आहे कारण!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2017 11:18 IST

संजय लीला भन्साळींचा आगामी चित्रपट ‘पद्मावती’मधील दीपिका पादुकोण आणि शाहिद कपूर यांचा लूक लोकांना प्रचंड भावला. यानंतर चाहत्यांना प्रतीक्षा ...

संजय लीला भन्साळींचा आगामी चित्रपट ‘पद्मावती’मधील दीपिका पादुकोण आणि शाहिद कपूर यांचा लूक लोकांना प्रचंड भावला. यानंतर चाहत्यांना प्रतीक्षा होती ती या चित्रपटात अल्लाऊद्दीन खिल्जीची भूमिका साकारणा-या रणवीर सिंगच्या लूकची. तर काल ती प्रतीक्षाही संपली. रणवीर सिंगचा लूक जारी करण्यात आला. पण रणवीरच्या या लूकवरून ‘पद्मावती’ची अख्खी टीम नाराज असल्याचे कळतेय. आश्चर्य वाटले ना? पण ते खरे आहे. ‘कल सुबह आएंगे सुल्तान अलाऊद्दीन खिल्जी’, असे tweet रणवीरने २ आॅक्टोबरला सकाळी केले होते. यानंतर ३ आॅक्टोबरला  अलाऊद्दीन खिल्जीचे लूक जारी करण्यात येणार होते. पण रणवीरला ते घाईघाईत २ आॅक्टोबरला मध्यरात्रीनंतर उशीरा जारी करावे लागले. म्हणजे त्याचा नाईलाज झाला. नेमक्या याच कारणावरून ‘पद्मावती’ची टीम सध्या नाराज आहे. त्याचे झाले असे की, अधिकृतरित्या पब्लिक होण्याआधीच रणवीरच्या अल्लाऊद्दीन खिल्जी लूकचे हे पोस्टर एका फिल्म पत्रकाराच्या हाती लागले आणि त्याने २ आॅक्टोबरला रात्री २ वाजता ते ते त्याच्या सोशल अकाऊंटवर शेअर केले. यानंतर ते वेगाने व्हायरल होऊ लागले. त्यामुळे ‘पद्मावती’ची टीम आणि रणवीरला हे पोस्टर लगेच शेअर करावे लागले. पोस्टर आधीच लीक झाल्यामुळे रणवीर कपूर आणि ‘पद्मावती’ची टीम प्रचंड नाराज असल्याचे कळतेय.ALSO READ : सुल्तान अलाऊद्दीन खिल्जीचा ‘लूक’ आला ! सोशल मीडियावर रणवीर सिंग ‘हिट’!!तसेचही या लीक प्रकरणामुळे सध्या संपूर्ण इंडस्ट्रीच्या नाकीनऊ आली आहे. अनेक चित्रपट, चित्रपटाचे ट्रेलर यापूर्वीही लीक झाले आहेत. पण एखाद्या चित्रपटाचे पोस्टर लीक होण्याची ही पहिलीच वेळ आहे.या चित्रपटात रणवीर सिंग निगेटीव्ह शेड्समध्ये दिसणार असला तरी त्याचे हे लूक लोकांना मनापासून भावले आहे. व्यक्तिरेखेनुसार, रणवीर यात काहीसा भयावह दिसतोय. केवळ दाढीचं नाही तर त्याचे केसही वाढलेले आहेत. चेहºयावर मोठ्या जखमेचा एक व्रण आहे. अर्थात तरिही रणवीरचे हे लूक प्रचंड प्रभावित करणारे आहे. सोशल मीडियावर त्याचे हे लूक प्रचंड हिट झाले आहे.