युलिया वेंटरच्या आयुष्यात कोण आहे ‘तो’स्पेशल? जाणून घ्या काय म्हणाली ती कपिल शर्माच्या शोवर...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2017 18:56 IST
‘बॉलिवूडचा दबंग’ सलमान खान आणि त्याची गर्लफ्रेंड युलिया वेंटर यांचं नातं काही ‘बी-टाऊन’ पासून लपून राहिलंय का? ब्रेक अप ...
युलिया वेंटरच्या आयुष्यात कोण आहे ‘तो’स्पेशल? जाणून घ्या काय म्हणाली ती कपिल शर्माच्या शोवर...
‘बॉलिवूडचा दबंग’ सलमान खान आणि त्याची गर्लफ्रेंड युलिया वेंटर यांचं नातं काही ‘बी-टाऊन’ पासून लपून राहिलंय का? ब्रेक अप झालं तरी ते दोघे पुन्हा एकत्र येतात. कधी म्हणतात, आम्ही चांगले मित्र, तर कधी लाँग ड्राईव्हवर एकत्र दिसतात. त्यांचा हा लपाछपीचा खेळ आता केव्हा थांबणार? अशी उत्सुकता चाहत्यांना लागलीये. अलीकडेच युलिया वेंटर ही हिमेश रेशमिया याच्यासोबत ‘आप से मौसिकी’ या अल्बमच्या प्रमोशनसाठी ‘कपिल शर्मा’ च्या शोवर आली होती. तेव्हा तिने सलमान खानसोबतच्या नात्याची ‘हिंट’ उपस्थित प्रेक्षकांना दिली. आता ही हिंट काय होती ते वाचा...कपिल शमार्चा शो सुरू होताच उपस्थित श्रोतावर्गातून एका महिलेने युलियाला तिच्या मुलाशी लग्न करण्याबद्दल विचारले. तेव्हा युलियाने त्यावर अतिशय रोमँटिक उत्तर दिले. ती म्हणाली,‘माझे हृदय मी ‘एका जणाला’ दिले आहे. माझे प्रेम माझ्या हृदयात बंदिस्त आहे.’ युलियाच्या आयुष्यातील हा ‘समवन एल्स’ कोण? हे आपल्याला कशाला कोणी सांगायला हवंय? अर्थात तुमचा-आमचा लाडका सल्लूमियाँ म्हणजेच सलमान खान. युलिया-सलमान हे अलीकडेच दुबईच्या एअरपोर्टवर एकमेकांना किस करताना आढळले. चर्चा अशीही आहे की, लवकरच भाई आता त्याचा ‘बॅचलर आॅफ द डिकेड’ हा टॅग काढून टाकून लग्नाच्या गोड बंधनात अडकणार आहे. युलिया वेंटर हिचं नातं काही फक्त सलमान खानसोबतच आहे असे नाही तर तिचं ‘खानदान’ सोबत देखील तितकंच चांगलं ट्यूनिंग जमतं. भाईच्या घरच्या प्रत्येक सोहळ्यात आत्तापर्यंत युलिया ही असतेच. सलमानसोबत वेळ घालवण्याचा एकही क्षण ती वाया जाऊ देत नाही. याचा अर्थ लवकरच सलमान-युलियाच्या लग्नाबद्दल आपल्याला ‘गुड न्यूज’ मिळणार असे दिसतेय. नाही का?