Join us

सिल्वर स्क्रिन कोण साकारणार गुलशन कुमार रणबीर की सुशांत ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2018 13:58 IST

आमिर खान सध्या गुलशन कुमार यांच्या बायोपिकसाठी अभिनेत्याच्या शोधात आहे. आम्ही तुम्हाला सांगितले होते की, यासाठी त्याची पहिली पसंद रणबीर कपूर होती.

ठळक मुद्देगुलशन कुमार यांच्या बायोपिकचे दिग्दर्शन सुभाष कपूर करणार आहेतया सिनेमाची चित्रीकरणाला पुढच्या वर्षी सुरूवात होणार आहे

आमिर खान सध्या गुलशन कुमार यांच्या बायोपिकसाठी अभिनेत्याच्या शोधात आहे. आम्ही तुम्हाला सांगितले होते की, यासाठी त्याची पहिली पसंद रणबीर कपूर होती. रणबीरच्या ही आधी मेकर्सनी अक्षय कुमारला या भूमिकेसाठी अप्रोच केले होते मात्र दिग्दर्शकासोबत झालेल्या मतभेदमुळे त्याने यातून एक्झिट घेतली.अक्षयने नकार दिल्यानंतर  भूषण कुमार यांना यासाठी त्यांना तरुण चेहरा हवा आहे. मोगुलसाठी आमिरला क्लास अभिनेत्याला साईन करायचे आहे. आता अशी माहिती मिळतेय की, रणबीर कपूरशिवाय आणखीन एक अभिनेत्याला अप्रोच करण्यात आले आहे.  

धोनीच्या बायोपिकमधून बॉलिवूड पदार्पण करणाऱ्या सुशांत सिंग राजपूतला देखील विचारण्यात आले आहे. मीडिया रिपोर्टनुसार आमिर खानने या सिनेमासाठी सुशांत अप्रोच केले आहे. सुशांतने नुकतेच सारा अली खान आणि त्याचा आगामी सिनेमा 'केदारनाथ'चे शूटिंग पूर्ण केले आहे आणि सध्या तो आगामी प्रोजेक्टसेमध्ये बिझी आहे. सुशांत हॉलिवूड 'द फॉल्ट इन अवर स्टार्स'चा हिंदी रिमेकमध्ये काम करतोय. 

 रणबीर कपूरचा नुकताच रिलीज झालेला ‘संजू’ सुपरडुपर हिट झाला. या चित्रपटाने संजय दत्तची ‘इमेज’ बदलल्यास मदत झाली. रणबीर कपूरसध्या आलिया भट्ट आणि अमिताभ बच्चन स्टारर 'ब्रह्मास्त्र'च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. तसेच रणबीरकडे करण मल्होत्राचा शमशेरा आहे. 

गुलशन कुमार यांच्या बायोपिकचे दिग्दर्शन सुभाष कपूर करणार आहेत. हा बिग बजेट चित्रपट असणार असल्याचे बोलले जाते. या सिनेमाची चित्रीकरणाला पुढच्या वर्षी सुरूवात होणार आहे. आता हे पाहणं उत्सुकत्याचे ठरणार आहे की या सिनेमात नक्की कोणाची एंट्री होणार.  

टॅग्स :रणबीर कपूरसुशांत सिंग रजपूत