Join us

कोण होतीस तू, काय झालीस तू..?; मराठमोळ्या या अभिनेत्रीची झालेली अशी अवस्था पाहून चाहते पडले चिंतेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2022 14:11 IST

मराठमोळ्या अभिनेत्रीचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. या फोटोत तिला ओळखणंदेखील कठीण झाले आहे.

मराठमोळी अभिनेत्री राधिका आपटे(Radhika Apte)ने आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर हिंदी आणि मराठी सिनेइंडस्ट्रीत आपले स्थान निर्माण केले आहे. गेल्या काही वर्षांत राधिकाने चित्रपटांमध्ये विविध प्रकारच्या भूमिका केल्या आहेत. राधिका सोशल मीडियावर देखील खूप सक्रिय आहे आणि ती चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी काही पोस्ट शेअर करत असते. आता राधिकाचा एक फोटो समोर आला आहे, ज्यामध्ये तिला ओळखणेदेखील कठीण झाले आहे.

राधिका आपटे हिने इन्स्टाग्राम अकाउंटवर स्वतःचा एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये तिचा लूक पूर्णपणे बदललेला आहे. त्यामुळे तिला ओळखणेदेखील कठीण झाले आहे. राधिकाचे केस खूपच लहान आणि विखुरलेले दिसत आहेत. तिचे कपडेही घाणेरडे दिसत आहेत. हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. 

खरेतर, राधिका आपटेचा हा लूक तिच्या २०१६ मध्ये रिलीज झालेल्या 'पार्च्ड' चित्रपटातील आहे. गुजरातच्या पार्श्वभूमीवर बनलेल्या या चित्रपटात तिने लज्जोची भूमिका साकारली होती. या चित्रपटात तिने आदिल हुसैनसोबत जबरदस्त इंटिमेट सीन दिले होते, ज्यामुळे सगळीकडे खळबळ माजली होती. या चित्रपटातील बोल्ड सीन्सची बरीच चर्चा झाली होती. राधिका आणि आदिलशिवाय सुरवीन चावला, लहार खान, तन्निष्ठ चॅटर्जी, सयानी गुप्ता यांसारख्या स्टार्सनी या सिनेमात काम केले होते.

राधिका आपटेने २००५ साली 'वाह! 'लाइफ हो तो ऐसी' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. 'पार्च्ड', 'बदलापूर', 'पॅडमॅन', 'लस्ट स्टोरीज', 'मांझी: द माउंटनमॅन', 'अंधाधुन' आणि 'बाझार' या चित्रपटात ती झळकली आहे. राधिका शेवटची २०२० मध्ये 'रात अकेली है' या चित्रपटात दिसली होती, ज्यामध्ये तिने नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत काम केले होते. 

टॅग्स :राधिका आपटे