हू रॉक्स द लास्ट डे आॅफ शूटींग ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2016 11:16 IST
सध्या शूटींगमध्ये फार बिझी असलेल्या अभिनेत्री कॅटरिना कैफ आणि दीपिका पदुकोन यांनी एकाच दिवशी चित्रपटाची शूटींग संपवली. पण गंमत ...
हू रॉक्स द लास्ट डे आॅफ शूटींग ?
सध्या शूटींगमध्ये फार बिझी असलेल्या अभिनेत्री कॅटरिना कैफ आणि दीपिका पदुकोन यांनी एकाच दिवशी चित्रपटाची शूटींग संपवली. पण गंमत म्हणजे त्यांनी शेवटचा दिवस कसा घालवला? याचे दोन व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.दीपिका व्हर्सेस कॅटरिना असे या व्हिडिओजचे नाव आहेत. कॅटरिना कैफ रणबीर कपूर सोबत ‘जग्गा जासूस’ च्या शूटींगसाठी मोरोक्कोत होती. तर दिपीका नॉर्थ अमेरिकेत ‘ट्रिपल एक्स : द रिटर्न आॅफ झांडर केज’ ची शूटींग करत होती.शेवटच्या दिवसाचे त्यांचे शूटींग पाहिले असता कळाले की, कॅटरिना अत्यंत गरम वातावरणात शूट करत होती. तर दीपिका तिच्या सेरेनाच्या अवतारात फॅन्सला एअरपोर्टवर भेटायला आली होती. आनंद एल.राय यांच्या आगामी चित्रपटात ती शाहरूख खानसोबत दिसणार आहे.